‘लोकांच्या घरात कपडे बदलायचे, दूरवर चालत वॉशरुम...’ करिश्माने उलगडले ९०च्या शुटींगचे सत्य

    25-Aug-2025
Total Views |


मुंबई : अभिनेत्री करिश्मा कपूर अनेक वर्षांपासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे. मात्र काहीना काही कारणाने ती सिनेविश्वात चर्चेत असते. एक काळ असा होता, करिश्माने बॉलिवूड आणि चाहत्यांच्या मनावर अनेक वर्षे राज्य केलं होतं… पण लग्नानंतर ती सिनेमांपासून हळू हळू दूर जाऊ लागली. पण करिश्मासाठी हा प्रवास फार कठीण होता. करिश्मा जरी फिल्मी कुटुंबातली असली तरी ९०च्या दशकातील शुटींग हे आजच्या काळापेक्षा फारच वेगळे होते. कारण आताच्या कलाकारांसाठी अनेक सुविधा आहेत. पण पूर्वी असं काहीही नव्हतं. ९० च्या दशकात कलाकारांना शुटिंगच्या दिवसांत अनेक समस्यांचा सामना करावा लागला. तेव्हा आराम करण्यासाठी खोली तर नव्हतीच पण कपडे बदलण्यासाठी देखील जागा नव्हती.. शिवाय स्वच्छ वॉशरुम देखील नसायचे. वॉशरूमला जाण्यासाठी सेलिब्रिटींना दूर चालत जावं लागत होतं. नुकताच करिश्माने याचा खुलासा केला आहे.

दरम्यान करिश्मा कपूर हिने वयाच्या खूपच लवकर आपल्या करियरला सुरुवात केली होती. १६ व्या वर्षीच तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. नुकत्याच झालेल्या एका इव्हेंटमध्ये करिश्मा म्हणाली, "गेल्या ३२ वर्षांपासून इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे. मी एक असा काळ पाहिला आहे, ज्यावर तुम्ही विश्वास देखील ठेवणार नाही. आम्ही झुडपांच्या मागे कपडे बदलले आहेत. जर कोणाला बाथरुमला जायचं असेल तर, दूर चालत जावं लागत होतं. तेव्हा पूर्ण युनिटमध्ये मॅडम टॉयलेटला जात आहे. अशी चर्चा व्हायची. मी तो काळ पाहिला आहे."

करिश्मा कपूरने पुढे सांगितलं, शूटिंग दरम्यान कलाकारांना स्वतः संसाधनांची व्यवस्था कशी करावी लागली, "आम्ही कायम रस्त्याच्या किनारी असलेल्या दुकानांमध्ये थांबायचो… तर अनेकांना आम्ही तुमच्या घरात कपडे बदलू का आमची शुटिंग सुरु आहे? असं विचारायचो. आज इंडस्ट्रीत अनेक मोठे बदल झाले आहेत. ते बदल पाहिल्यानंतर विश्वास देखील बसत नाही…"

करिश्मा कपूर पुढे म्हणाली, "आम्ही असे सिनेमे बनवायचो ज्यात आम्ही फक्त डबिंग करायचो. त्याआधी आम्ही कधीही फुटेज पाहिले नव्हते. सिनेमा पडद्यावर प्रदर्शित झाल्यावरच आम्हाला त्याचा परिणाम दिसायचा.." असं देखील करिश्मा म्हणाली..

करिश्मा आता सिनेमापासून दूर असली तरी, तिचे लाखो चाहते आहेत. सोशल मीडियावर करिश्माच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. तर आपल्या मुलांसोबत वेळ घालवत असते. करिश्मा तिच्या खासगी आयुष्यामुळे देखील कायम चर्चेत असते. काहीच दिवसांपूर्वी करिश्माचा पूर्वाश्रमीचा पती आणि उद्योजक संजय कपूर यांचं निधन झालं. संजय आणि करिश्मा यांचं नातं लग्नानंतर फार काळ टिकलं नाही. लग्नाच्या १२ वर्षांनंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर करिश्मा सिंगल मदर म्हणून दोन मुलांचा सांभाळ करत आहे. करिश्माला एक मुलगा आणि एक मुलगी आहे.