सहयोगातून सेवेकडे! उज्ज्वल भविष्याकडे!

    26-Aug-2025
Total Views |


स्वातंत्र्योत्तर भारतात आजही, ग्रामीण, शहरी आणि आदिवासी भागातील वंचित समाजाला शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, पर्यावरण, स्त्रीसक्षमीकरण आणि आर्थिक स्थैर्य या क्षेत्रांमध्ये भेडसावणाऱ्या अनेकविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. कितीतरी सामाजिक संस्था या विषमतेची दरी बुजवण्यासाठी धडपडत आहेत. यातीलच एक अग्रगण्य संस्था आहे, ‘सेवा सहयोग फाऊंडेशन.’‘सेवा सहयोग फाऊंडेशन समाजाच्या विकासासाठी आणि कल्याणासाठी सातत्याने कार्य करते. संस्थेच्या कार्याचा मागोवा या लेखात घेतला आहे.


हीउच्चशिक्षित, ध्येयवादी व्यक्तींनी पुढाकार घेऊन दि. ३१ ऑगस्ट २००९ रोजी ‘सेवा सहयोग फाऊंडेशन’ची स्थापना केली. संस्थेचा मुख्य उद्देश ‘आहे रे’ आणि ‘नाही रे’ यातील दरी भरून काढण्यासाठी प्रयास करणे. तसेच, सक्षम समाजनिर्मितीसाठी सातत्यपूर्ण, पारदर्शक आणि परिणामकारक उपक्रम राबवणे, हा आहे. गेल्या १६ वर्षांच्या प्रवासात शिक्षण, सक्षमीकरण तसेच पर्यावरण या तीन आयामांतील विविध प्रकल्पांद्वारे संस्थेने मुंबई व पुणे येथील ग्रामीण तसेच शहरी भागांत व्यापक कामाचा अमीट ठसा उमटवला आहे. २०१४ मध्ये उडठ कायद्याची अंमलबजावणी झाल्यानंतर अनेक कंपन्यांनी सामाजिक विकासासाठी पुढाकार घेतला आणि ‘सेवा सहयोग फाऊंडेशन’च्या कार्याला सक्रिय गती मिळाली. ‘शिक्षा विकास प्रकल्पा’द्वारे आपण ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील ५५० शहरी व ग्रामीण शाळांमध्ये आधुनिक विज्ञान प्रयोगशाळा, ग्रंथालये, सौरऊर्जेची विद्युतव्यवस्था, स्वच्छतागृहे, रेनवॉटर हार्वेस्टिंग यांसारख्या सुविधा निर्माण केल्या आहेत.

विज्ञान व तंत्रज्ञान प्रकल्पांतर्गत ‘कम्युनिटी नॉलेज हब’सारखे आगळे-वेगळे केंद्र पनवेल येथे उभारले गेले, ज्यामध्ये विज्ञान प्रयोगांद्वारे तसेच विज्ञान प्रदर्शनांद्वारे ७० शाळा आणि आठ हजार विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची रुची निर्माण करण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न होत आहे. मुंबई उपनगर तसेच ग्रामीण अतिदुर्गम भागांत, जिथे प्रयोगशाळेसारख्या सुविधा उपलब्ध नाहीत, तिथे नॉलेज ऑन व्हील्स (फिरती प्रयोग शाळा) मार्फत विज्ञान प्रयोगांचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात येतो. आजमितीस सहा फिरत्या विज्ञान प्रयोगशाळा मुंबई उपनगर, नवी मुंबई, विरार, पालघर, पेण व ठाणे या जिल्ह्यांत ठिकाणी कार्यरत आहेत. तज्ज्ञ प्रशिक्षकांद्वारे आपण विज्ञान शिक्षकांना अद्ययावत उपकरणांचे तसेच रंजकतेने विज्ञान विषय कसा शिकवावा, याचे नियमित प्रशिक्षणदेखील देतो.

या सुविधांबरोबरच पर्यावरण संवर्धन अंतर्गत संस्थेने ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण मोहिमा राबवल्या. १४५ पेक्षा जास्त शाळांमध्ये सौरऊर्जेचा वापर होत आहे. त्यामुळे ८३९ मेगावॅट विजेची बचत झाली आहे. या सर्व उपक्रमांतून शाश्वत आणि निसर्गस्नेही विकासाचा संदेश पोहोचवण्यात आला आहे. मुंबई तसेच नवी मुंबई परिसरात २२ ठिकाणी २ लाख, १ हजार, ६६४ चौ. फूट क्षेत्रांत आपण मियावाकी तंत्राद्वारे शहरी वनीकरण केले आहे. संस्थेचा किशोरी विकास उपक्रम मुलींना आत्मभान, आत्मविश्वास आणि आरोग्याविषयी जागरूकता देणारा एक परिवर्तनशील टप्पा ठरत आहे. स्वअभिज्ञता, मानसिक ताणतणाव व्यवस्थापन, पौगंडावस्थेतील भावनांची समज व प्रकटीकरण, सोशल मीडियाचा सुज्ञ वापर अशा अनेक विषयांवर या मुलींना शिक्षण दिले जाते. किशोरींसाठी आरोग्य किट वाटप, आरोग्य तपासणी, पथनाट्य, मासिक पाळीबद्दल जागरुकता, नवरात्र अशा अनेकविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थिनींना आत्मभान व आत्मविश्वास देण्यासाठी किशोरी विकासची टीम झटत असते. आज ११० हून अधिक वर्गांद्वारे २ हजार, ३१० पेक्षा अधिक किशोरी मुली या उपक्रमाशी जोडल्या गेल्या आहेत. पालघर मुंबई, ठाणे, नवी मुंबई, शहापूर, कर्जत, खोपोली, माणगाव, महाड, श्रीवर्धन येथे सध्या किशोरी वर्ग सुरू झाले आहेत.

२०१७ पासून संस्थेने ग्रामविकास प्रकल्प सुरू केला आहे. पेणंद गावातून सुरू झालेला हा प्रकल्प आज ५०० हून अधिक शेतकर्यांपर्यंत पोहोचला आहे. पालघर व वाडा या दोन तालुक्यातील सात ग्रामपंचायती व २१ पाड्यांमध्ये सेंद्रिय शेती, शेती शाळा, जैविक खत व कीटकनाशकनिर्मिती, विक्रीसाखळी, जलसंधारण, महिलांसाठी टेलरिंग व अन्नपूर्णा उपक्रम, युवकांसाठी शेतीपूरक व्यवसाय प्रशिक्षण अशा उपक्रमांमुळे अनेक गावांच्या आर्थिक आणि सामाजिक सक्षमतेला चालना मिळाली आहे. गावागावांतून निर्माण केलेल्या गाव समित्यांमुळेदेखील गावकर्यांचा या कार्यात प्रत्यक्ष सहभाग वाढताना दिसत आहे, ग्रामीण महिलांचा वाढता सहभाग हे सुखद दृश्य ग्रामविकास टीमला पाहायला मिळत आहे. ‘सेवा सहयोग फाऊंडेशन’चा समुत्कर्ष अभ्यासिका प्रकल्प हा समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल पार्श्वभूमीतील विद्यार्थ्यांसाठी कार्यरत आहे. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास, व्यक्तिमत्त्व विकास आणि त्यांच्या भविष्याची पायाभरणी या उद्देशाने ‘सेवा सहयोग फाऊंडेशन’ वस्त्यांमध्ये व गावांमध्ये विनामूल्य अभ्यासिका चालवत आहे. या अभ्यासिकांमध्ये विद्यार्थ्यांच्या अभ्यासाबरोबरच त्यांच्या अंगी असलेल्या विविध कलागुणांना वाव मिळतो. समुत्कर्ष अभ्यासिका सोमवार ते शनिवार दररोज दोन तास चालतात. आजमितीस १. प्राथमिक (पहिली ते चौथी) २. माध्यमिक (पाचवी ते आठवी) ३. सपोर्ट क्लास (नववी व दहावी) अशा गटांमध्ये एकूण ११० अभ्यासिका केंद्रे २ हजार, ५०० पेक्षा अधिक तळागाळातील विद्यार्थ्यांना आकार देण्याचे कार्य करीत आहेत. दहावीनंतर उच्चशिक्षणासाठी या विद्यार्थ्यांना ‘विद्याश्रय योजनें’तर्गत अर्थसाहाय्यदेखील दिले जात आहे.

‘विद्यार्थी विकास योजना’ ही ‘सेवा सहयोग फाऊंडेशन’ची एक महत्त्वपूर्ण आणि दीर्घकालीन योजना आहे. या योजनेद्वारे गरजू तसेच हुशार विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन आणि व्यावसायिक शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. मागील १४ वर्षांत २ हजार, ३९६ विद्यार्थ्यांना एकूण २७ कोटी रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात आली आहे. यातील अनेक विद्यार्थी आज ‘टाटा’, ‘महिंद्रा’, ‘इन्फोसिस’, खउखउख, ङढ यांसारख्या नामवंत कंपन्यांमध्ये कार्यरत आहेत. विशेष म्हणजे, याच योजनेचे लाभार्थी असलेल्या काही माजी विद्यार्थ्यांनी संस्थेला ६३.५७ लाख रुपयांचा निधी समाजाच्या ऋणांत उतरल्याच्या भावनेतून परत दिला आहे.

स्वयंसेवी उपक्रम हा संस्थेचा अजून एक महत्त्वाचा आयाम! कॉर्पोरेट कंपन्यांच्या माध्यमातून पेपर बॅग, पेपर पेननिर्मिती, झाडांची रोपे लावणे, समुद्रकिनार्यांची साफसफाई, लळअॅव षशशवशअॅी, ुरश्रश्र रिळपींळपस, ीशशव लरश्रश्री, शैक्षणिक मदत अशा अनेक कार्यक्रमांतून स्वयंसेवकांना सामाजिक बांधिलकीचा अनुभव दिला जातो. या उपक्रमांनी केवळ विद्यार्थ्यांनाच नव्हे, तर सहभागी स्वयंसेवकांच्या सहवेदना आणि सामाजिक जाणिवा सजग होण्यात साहाय्यता होत आहे. संस्थेची ओळख निर्माण करणारा प्रकल्प म्हणजे शालेय साहित्य संच (डलहेेश्र घळीं) वितरण. आजतागायत ठाणे, रायगड, नगर, पालघर आणि रत्नागिरी या जिल्ह्यांतील गरजू शाळांमध्ये हजारो विद्यार्थ्यांना आवश्यक साहित्य असलेले सहा लाख संच वितरित करण्यात आले आहेत. ५०० पेक्षा अधिक शाळांशी संस्थेचा संपर्क असून दरवर्षी अनेक नवीन शाळा या उपक्रमात सहभागी होतात. विद्यार्थ्यांना समान संधी मिळावी, शिक्षणात अडथळा येऊ नये आणि त्यांचा आत्मविश्वास वाढावा, या हेतूने या संचांचे वितरण करण्यात येते. कौशल्य विकास, क्रीडा विकास तसेच संगणक साक्षरतेसाठीदेखील संस्था खूप छान उपक्रम राबवत आहे. कर्जत तसेच सानपाडा, नवी मुंबई येथे ‘संजय हेगडे क्रीडा विकास अॅकेडमी’ चालते, जिथे आज तीनपेक्षा जास्त विद्यार्थी शिकत आहेत. कराटे, तिरंदाजी, टेबल टेनिस, इरवाळपीेंप, अॅथलेटिक्स व मल्लखांब अशा अनेक खेळांचे प्रशिक्षण घेऊन जिल्हा, राज्य तसेच राष्ट्रीय स्तरांवर चमक दाखवत आहेत. संगणक साक्षरता केंद्र नेरूळ व बोईसर येथे चालत असून विद्यार्थ्यांना मोफत संगणक प्रशिक्षण दिले जाते. सफाळे व बोईसर येथे महिलांसाठी व्यवसायाभिमुख अभ्यासक्रम ही चालवले जातात. ‘सेवा सहयोग फाऊंडेशन’ हे एक कार्यकर्त्यांवर आधारित, मूल्यनिष्ठ आणि दीर्घदृष्टी असलेले संस्थात्मक मॉडेल बनले आहे. संस्थेच्या विचारांवर विश्वास ठेवणारे अनेक तरुण व ज्येष्ठ कार्यकर्ते आज सेवाकार्यात सक्रिय आहेत. ‘सेवा सहयोग’ ही संस्था केवळ प्रकल्प राबवणारी साखळी नसून समाजसेवेची एक प्रेरणादायी चळवळ आहे.१६ वर्षांपूर्वी केवळ एका खोलीतून सुरू झालेला ‘सेवा सहयोग’चा प्रवास, आज हजारो गरजूंपर्यंत पोहोचला आहे. वाटेत अनेक अडथळे आले. ‘करोना’सारखे राष्ट्रीय संकट, सामाजिक आव्हाने, आर्थिक मर्यादा. पण या सेवारथाला न थांबता पुढे घेऊन जाण्याचे बळ या समाजाकडूनच मिळत आहे. या घडीला धर्म, जाती, पंथ, भाषा, भूगोल या सर्व भिंती झुगारून, ‘सेवा सहयोग’ने समाजात एक नवा आशावाद निर्माण केला आहे. ‘कोणीही विकासापासून वंचित राहू नये’ हा आमचा उदात्त हेतू आज हजारो हृदयांत ठामपणे रुजला आहे. आज मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, बदलापूर, सफाळे व नाशिक या ठिकाणी ‘सेवा सहयोग’ची कार्यालये कार्यरत आहेत. मात्र, हे कार्य केवळ कार्यालयांपुरते मर्यादित नाही, तर लोकांच्या सहभागातून, गावागावांत, वस्त्यांमध्ये, दुर्गम भागातही हे कार्य रुजले आहे. ‘सेवा सहयोग’मुळे असंख्य विद्यार्थ्यांचे शिक्षणाचे स्वप्न साकार झाले आहे. त्यांच्या आयुष्याची दिशा बदलली आहे आणि त्यातून पुढच्या पिढीला संघर्ष नाही, तर संधी मिळाली. काल संघर्ष होता, आज आशा आहे आणि उद्याचा मार्ग हा उत्कर्षाचा असेल.या शुद्ध हेतूच्या कार्यात ज्या हातांचा हातभार लागतो आहेत, ते सारे हात ईश्वरी प्रेरणेचे रूप आहेत. म्हणूनच, ही सेवा अविरत सुरू राहो, समाजात आशेचा दीप तेवत राहो, हीच ईश्वरचरणी मनःपूर्वक प्रार्थना! यस्य जीवनं परसेवायै स फलवत्तरं|

विनय बर्वे
(ज्याचे जीवन परसेवेकरिता अर्पण आहे, त्याचे जीवनच खरे फलदायी असते.)