
मुंबई : बॉलिवूडचा या वर्षातला सुपर डुपर ब्लॉकबस्टर सिनेमा म्हणजे 'छावा'. सिनेमा रिलीज होण्याच्या आधीपासूनच त्याची तुफान चर्चा रंगली होती. सिनेमा रिलीज झाला आणि छत्रपती संभाजी महाराजांचं शौर्य अवघ्या भारताने रुपेरी पडद्यावर पाहिलं. केवळ भारतातच नाही जगभरात प्रेक्षकांनी सिनेमा पाहिला. छत्रपती शंभू राजांच्या पराक्रमाची, शौर्याची अनुभूती अख्ख्या जगानं अनुभवली. काही दिवसांपूर्वीच ब्लॉकबस्टर सिनेमा टीव्हीवर दाखवण्यात आला. त्यावेळी काही डिलीट केलेले सीन्स टीव्हीवर दाखवण्यात आले. सध्या 'छावा'मधल्या डिलीट केलेल्या सीन्सची जोरदार चर्चा सुरू आहे. छावा सुपरहीट ठरला पण या सिनेमाला अनेक कट्स लागले होते. हे अगदी सिनेमा पाहतानाही जाणवत होतं. पण सध्या सोशल मीडियावर हे डिलीटेड सिन्स पाहायला मिळत आहेत.
'छावा' सिनेमा काही दिवसांपूर्वी टीव्हीवर दाखवण्यात आला. तेव्हा दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी 'छावा' सिनेमातील डिलीट केलेले काही सीन्स टीव्हीवर दाखवले आहेत. त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला. 'छावा' सिनेमातील असाच एक डिलीट झालेला सीन समोर आला आहे. या सीनमध्ये शंभूराजे औरंगजेबाला सडेतोड उत्तर देत असल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या या व्हिडीओला चांगले व्ह्यूज सोशल मीडियावर आलेले दिसत आहेत.
दरम्यान या सीनमध्ये नेमकं काय दाखवलंय? पाहा
विक्की कौशलच्या एका फॅन पेजने हा सीन सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेव एकमेकांसमोर उभे आहेत. "राजा तो असतो जो संपूर्ण देश स्वतःच्या मुठीत ठेवतो", असं औरंगजेब शंभूराजेंना समजावतो. पण, त्यापुढे औरंगजेबाला सडेतोड उत्तर देऊन शंभूराजे औरंगजेबाची बोलती बंद करतात. "मला माझा हिंद प्रांत माझ्या मुठीत ठेवायचा नाहीये... तर त्याला स्वतंत्र बघायचंय...", असं औरंगजेबाला छत्रपती संभाजी महाराज म्हणतात.
याशिवाय अजूनही बरेच सीन्स आहेत जे थिएटरमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळाले नव्हते. पण आता टीव्हीवर ते दिसत आहेत.