त्रुटी काढून आम्ही मराठा आरक्षण देऊ, मुख्यमंत्र्यांची सर्वपक्षीय बैठकीत ग्वाही
01-Nov-2023
Total Views | 68
मुंबई : त्रुटी काढून आम्ही मराठा आरक्षण देऊ. आम्ही आरक्षणाच्या बाजूने आहोत. सुप्रीम कोर्टात क्युरेटीव्ह पिटीशन दाखल करण्यात आली आहे. आणि त्याची तारीख लवकरच मिळणार आहे. असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय बैठकीत सांगितलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलवली आहे. या बैठकीसाठी अनेक नेते 'सह्याद्री'वर दाखल झाले आहेत.
मराठा आरक्षणविषयक सर्वपक्षीय बैठकीत अंबादास दानवे आणि विजय वडेट्टीवार दोन्ही विरोधी पक्षनेते आक्रमक झाले. आरक्षणावर राज्याने केंद्राशी संपर्क केलाय का? असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी केला. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळली आहे, असे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्हटले आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले द्या. अशी मागणी केल्यानंतर याला पाठिंबा दर्शवत मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले दिले पाहिजे, अशी मागणी आमदार बच्चू कडू यांनी केली आहे.
मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन हातळण्यात सरकार कमी पडत आहे. जरांगे पाटील यांच्या उपोषणावर तात्काळ तोडगा काढण्यात यावा. मराठा आरक्षणावर केंद्राने हस्तक्षेप करावा, असे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.