आमदार अपात्रता प्रकरणी उबाठा – शरद पवार गट एकत्र, सर्वोच्च न्यायालयात १३ रोजी सुनावणी
09-Oct-2023
Total Views | 52
नवी दिल्ली : आमदार अपात्रताप्रकरणी तत्काळ सुनावणीचे निर्देश देण्याची विनंती करणाऱ्या उबाठा आणि राष्ट्रवादी काँग्रेस- शरद पवार गट यांच्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात १३ ऑक्टोबर रोजी एकत्रित सुनावणी होणार आहे.
महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे शिवसेना आमदारांची अपात्रता प्रकरण प्रलंबित आहे. त्याचवेळी राष्ट्रवाद काँग्रेसच्य शरद पवार गटाने अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या ४१ आमदारांवर विधानसभा अध्यक्षांनी अपात्रता कारवाई करावी, अशी विनंती केली आहे. शरद पवार गटाने तशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने पवार गटाच्या याचिकेवर स्वतंत्रपणे सुनावणी घेण्यास सोमवारी नकार दिला आहे.
विधानसभा अध्यक्ष नार्वेकर हे कार्यवाहीमध्ये दिरंगाई करत असल्याचा आरोप उबाठा गटाने केला आहे. पवार गटाकडूनही तोच आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या याचिकांवर आता १३ ऑक्टोबर रोजी एकत्रित सुनावणी होणार आहे.