आमदार अपात्रतेसह ओबीसी आरक्षणावरील सुनावणी पुढे ढकलली

    04-Oct-2023
Total Views | 154

suprim court

नवी दिल्ली :
आमदार अपात्रता तसेच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतील ओबीसी आरक्षणाची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी अनुक्रमे ९ ऑक्टोबर आणि २८ नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.

विधानसभा अध्यक्षांच्या कार्यवाहीविरोधात उबाठा गटाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात होणारी सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. आमदार अपात्रता कार्यवाहीविषयक सुनावणी यापूर्वी ६ ऑक्टोबर रोजी होणार होती. त्यावेळी विधानसभा अध्यक्षांकडून सर्वोच्च न्यायालयास कार्यवाहीचे वेळापत्रक सादर केले जाणार होते. विधानसभा अध्यक्षांनी त्यांच्याकडून होणाऱ्या कार्यवाहीची पुढील तारिख १३ ऑक्टोबर निश्चित केली असून डिसेंबरपर्यंत अंतिम युक्तीवाद सुरू होणार आहे. आता सर्वोच्च न्यायालयात याविषयी पुढील सुनावणी ९ ऑक्टोबर रोजी होणार आहे.

त्याचप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्था आणि ओबीसी आरक्षणविषयक सुनावणीदेखील सर्वोच्च न्यायालयाने पुढे ढकलली असून आता पुढील सुनावणी थेट २८ नोव्हेंबर रोजी होणार आहे. मुंबईसह अनेक महानगरपालिका जिल्हा परिषदा, इतर स्थानिक स्वराज्य संस्था या सगळ्या निवडणुकांचs भवितव्य सर्वोच्च न्यायालयाच्या या सुनावणीवर अवलंबून आहे.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121