"हमास दहशतवादी संघटना नाही"- खासदार शफीकुर रहमान बारक
31-Oct-2023
Total Views | 30
मुंबई : "हमासला दहशतवादी संघटना घोषित करू नये आणि त्याऐवजी आपण सर्वांनी हमासच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे" असे धक्कादायक विधान समाजवादी पक्षाचे खासदार शफीकुर रहमान बारक यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना केले आहे. सध्या सुरू असलेल्या इस्रायल-हमास युद्धाबाबत बोलताना सपा खासदार म्हणाले की, "युद्ध संपवण्यासाठी प्रयत्न व्हायला हवे होते आणि पॅलेस्टिनी लोकांना जी मदत हवी होती ती दिली गेली नाही."
मोदी सरकारवर निशाणा साधत सपा खासदार पुढे म्हणाले, “मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली पॅलेस्टाईनला नेहमीच मदत केली गेली. आज या सरकारमध्ये काय चालले आहे की पॅलेस्टाईनला मदत करण्याऐवजी ते गप्प आहे. आणि यावेळी ते आवश्यक ती मदत देत नाहीत.”
त्यांच्या या दहशतवाद समर्थक विधानानंतर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि शफीकुर रहमान बारक यांच्या विधानावर टीका होत आहे. त्यांच्यावर तुष्टीकरणाच्या राजकारण करत असल्याचा आरोप केला जात आहेत. समाजवादी पक्षच नाहीतर इंडिया आघाडीतील इतर पक्षांनी सुद्धा हमासचे समर्थन केले आहे.