नवी दिल्ली : दिल्लीत घरवापसीचे एक प्रकरण उघडकीस आले आहे. त्यात गुलफ्शा हिने इस्लाम धर्माचा त्याग करून सनातन धर्म स्विकारला आहे. त्यानंतर तिने आकाश राजपूत नावाच्या तरुणासह विवाह ही केला. आता तरुणीचे नाव स्नेहा राजपूत आहे. दरम्यान दुसरीकडे तरुणीच्या कुटुंबियांनी तिला आणि आकाशला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे पीडितेने पोलीसांकडे सुरक्षेची मागणी केली आहे. हे प्रकरण दिल्लीतील सुलतानपुरी विभागातील आहे.
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, आकाश राजपूतने एक पत्र प्रसिद्ध केले आहे. ज्यात त्याने सांगितले की, तीन महिन्यापुर्वी आकाशने गुलफ्शासोबत राजस्थानातील कोटामध्ये विवाह केला. दोघंही वैवाहिक आयुष्यात आनंदित आहेत. मात्र पीडित तरुणीच्या कुटुंबियांकडून तिला सतत धमक्या दिल्या जात आहेत. त्यामुळे गुलफ्शाने FIR ही दाखल केली आहे. ज्यात पीडितेने तिचे अब्बा तिला वाईट नजरेने पाहत असल्याचे सांगितले.
दरम्यान पीडित तरुणाने सांगितले की, FIR दाखल करून ही पीडित तरुणीच्या कुटुंबियांविरोधात कोणतीच कारवाई झालेली नाही. त्यामुळे पीडित तरुणाला आपल्या कुटुंबाच्या हत्याची भीती सतावत आहे. आकाश आणि गुलफ्शा ह्यांच्यात गेल्या तीन वर्षापासून प्रेमसंबध आहेत. दरम्यान गुलफ्शाचे नाव बदलून स्नेहा ठेवण्यात आल्याने हिंदू धर्मियांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.