धुळ्याच्या एमआयएम आमदाराने उभारला टिपूचा चौथरा! गुन्हा दाखल करण्याची नितेश राणेंची मागणी
25-Oct-2023
Total Views | 140
धुळे : धुळ्यात हिंदूद्वेष्टा टिपू सुलतानचा चौथरा उभारणाऱ्या एमआयएम आ. फारूक शहा यांच्याविरोधात भाजप आ. नितेश राणे यांनी शड्डू ठोकले आहेत. दरम्यान, टिपू सुलतान याचा पुतळ्यासाठी शासकीय निधीमार्फत चौथरा उभारण्यात आला याविरोधात सकल हिंदू समाजाने मोर्चा काढून आवाज उठविल्याचे भाजप आ. नितेश राणे यांनी सांगितले. तसेच, हिंदूद्वेष्टी प्रवृत्तींविरोधात देशद्रोहाचा खटला चालविला पाहिजे, असेही नितेश राणे म्हणाले.
आ. फारुक शहा यांनी उभारलेल्या पुतळ्यासंदर्भात आम्ही राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात आहोत असे सांगतानाच राज्यात, हिंदू राष्ट्रात टिपू सुलतान याचे उदात्तीकरण करणाऱ्यांकडून यापुढे काळजी घेतली जाईल, असा निर्वाणीचा इशारा नितेश राणेंनी यावेळी दिला.
आमदार फारुक शहा यांनी शासकीय निधीचा दुरुपयोग करून टिपू सुलतानचे स्मारक विनापरवानगी उभारून शासकीय यंत्रणा पायदळी तुडवून सकल हिंदू समाजाला डिवचण्याचे काम केले आहे. धुळे शहरात हिंदू मुस्लिम तेढ निर्माण व्हावी हाच त्यामागचा उद्देश असल्याने त्याच्यावर देशद्रोहाची कारवाई व्हावी अन्यथा सकल हिंदू समाज तीव्र आंदोलन छेडेल याची नोंद प्रशासनाने घ्यावी असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
६ जून २०२३ रोजी धुळे शहरातील वडजई चौकात मुस्लीम वस्तीत शासनाची कुठलीही परवानगी न घेता आमदार फारुख शाह यांनी विनापरवानगी चौथरा बांधून त्याचे टिपू सुलतान चौक असे नामकरण केले. सदर बांधकाम निष्काशित करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा यासाठी मुख्यमंत्री, गृह मंत्री तसेच पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी व मनपा आयुक्त (धुळे) यांच्याकडे तक्रार अर्ज करण्यात आला आहे. याची दखल घेत प्रशासनाने संबंधित ठेकेदार यांच्याकडून तो चौथरा निष्कासित केला.
तक्रारीचा राग मनात धरुन समाजकंटक नासीर खान, आरीफ मिरचीवाले, शाकीब शेख, सरफराज शेख, शेख हाजुसाब, मुस्तकीन शेख, अनिस शेख, अब्दुल सरकार, अबु सुफियान यांनी चौथरा निष्काषित झाल्याने विचलित होऊन मुस्लीम समाजातील लोकांकडुन सामाजिक माध्यमाद्वारे तक्रारदारांना जिवे ठार मारण्याच्या धमक्या देण्यात येत आहेत. त्यामुळे आमदार फारुख शहा व अन्य लोकांविरुध्द गुन्हा दाखल व्हावा अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.
तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविरुध्द आपत्तीजनक लिखाण करण्यात आले. त्यामुळे धर्मवंश व भाषा आदी कारणांवरून शत्रुत्व वाढविण्याचे काम तसेच धार्मिक भावना व धर्माचा हेतुपुर्वक अवमान करुन सार्वजनिक शांततेविरुध्द खोटी विधान व अफवा प्रसारीत करण्यात येत आहेत. तसेच मनपाचे व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिपत्याखाली असलेल्या जागेवर विनापरवाना चौथऱ्याचे बांधकाम करुन सार्वजनिक शासकीय मालमत्तेचे विद्रुपीकरण केले आहे.