मुंबई : केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळात विविध पदांकरिता अधिसूचना जारी करण्यात आली आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळातील विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीच्या माध्यमातून विविध पदांच्या एकूण ११ जागा भरल्या जाणारा आहेत.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळातील रिक्त जागा पुढीलप्रमाणे असून याअंतर्गत वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, लेखाधिकारी, सहायक लेखाधिकारी, वरिष्ठ तांत्रिक पर्यवेक्षक, खाजगी सचिव, तांत्रिक पर्यवेक्षक पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
सदर भरतीकरिता उमेदवारांना अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ नोव्हेंबर २०२३ असणार आहे. तसेच, उमेदवारांना अर्ज हा प्रशासकीय अधिकारी (भरती), केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, “परिवेश भवन”, पूर्व अर्जुन नगर, शाहदरा, दिल्ली-110032 या पत्त्यावर पाठवायचा आहे. भरतीविषयक अधिक तपशील जाणून घेण्यासाठी
अधिकृत वेबसाईटला भेट द्या.