महात्मा गांधींना आदरांजली देण्यासाठी पंतप्रधान मोदी राजघाटवर!
02-Oct-2023
Total Views | 40
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजघाटवर महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना श्रद्धांजली वाहिली. यासोबतच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासह अनेक नेत्यांनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण केली.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत बापूंचे स्मरण केले. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, "गांधी जयंतीनिमित्त मी महात्मा गांधींना नमन करतो. त्यांची कालातीत शिकवण आमचा मार्ग उजळत राहते. महात्मा गांधींचा प्रभाव जागतिक आहे जो संपूर्ण मानवजातीला एकता आणि करुणेची भावना पुढे नेण्यासाठी प्रेरित करतो."
"त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहूया. त्यांचे विचार आणि त्यांनी ज्या बदलाचे स्वप्न पाहिले होते त्याचे एजंट बनण्यास प्रत्येक तरुणाला सक्षम बनवा, ज्यामुळे सर्वत्र एकता आणि सुसंवाद वाढेल," असेही ते म्हणाले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल बहादूर शास्त्री यांनाही आदरांजली वाहिली.
ते म्हणाले की, "लाल बहादूर शास्त्रीजींना त्यांच्या जयंतीनिमित्त स्मरण करतो. त्यांचा साधेपणा, देशाप्रती समर्पण आणि ‘जय जवान, जय किसान’ ही प्रतिष्ठित हाक आजही पिढ्यांना प्रेरणा देत आहे. भारताच्या प्रगतीसाठी त्यांची अतूट बांधिलकी आणि आव्हानात्मक काळात त्यांचे नेतृत्व अनुकरणीय आहे. सशक्त भारताचे त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी आपण नेहमी कार्य करू या." असे ते म्हणाले.