नवी दिल्ली : युरोपियन युनियनचे मुख्यालय असलेल्या ब्रुसेल्समध्ये दोन स्वीडिश नागरिकांची हत्या करण्यात आली. हत्येचा संशय असलेल्या व्यक्तीची पोलिसांनी हत्या केल्याचे सांगितले जात आहे. हा दहशतवादी हल्ला होता. दि. १६ ऑक्टोबर २०२३ रोजी तिथे २ स्वीडिश नागरिकांची हत्या करण्यात आली. दुसऱ्या दिवशी सकाळी पोलिसांनी हे हत्याकांड घडवणाऱ्या दहशतवाद्याला ठार केले. बेल्जियमच्या अंतर्गत व्यवहार मंत्री अॅनेलिस वर्लिंडन यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. पोलिस आले तेव्हा मारेकरी एका कॅफेमध्ये बसला होता.
पोलिसांना पाहताच त्याने गोळीबार सुरू केला, त्यानंतर पोलिसांनीही प्रत्युत्तर दिले. स्थानिक वेळेनुसार मंगळवारी पहाटे पाचच्या सुमारास बेल्जियमचे पंतप्रधान अलेक्झांडर डी क्रो यांनी सांगितले की, दहशतवादी ट्युनिशियाचा रहिवासी आहे. त्यांनी सांगितले की तो बेल्जियममध्ये बेकायदेशीरपणे राहत होता. शहराच्या मध्यभागी असलेल्या ग्रँड पॅलेसपासून हाकेच्या अंतरावर ही घटना घडली. बेल्जियम आणि स्वीडन यांच्यात फुटबॉल सामना सुरू होता, त्यादरम्यान ही घटना घडली. हे क्षेत्र सेंट कॅथरीन्सपासून अगदी थोड्या अंतरावर आहे, जेथे शहरातील उत्कृष्ट बार आणि रेस्टॉरंट्स आहेत.
मात्र, या हत्याकांडानंतर स्वीडन-बेल्जियम सामना रद्द करण्यात आला. डी क्रो म्हणाले की, मारेकऱ्याने स्वीडनच्या फुटबॉल समर्थकांना लक्ष्य केले. बेल्जियममधील अनेक भागात जेथे मोठ्या प्रमाणात स्वीडिश नागरिक आहेत तेथे सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. स्वीडनमध्ये कुराण जाळण्याच्या घटनांमुळे इस्लामिक कट्टरपंथी स्कँडिनेव्हियामध्ये असलेल्या या देशाला विरोध करत आहेत. स्टॉकहोममध्येही हिंसाचाराच्या घटना घडल्या, त्यानंतर स्वीडनमध्ये अलर्ट जारी करावा लागला.
युरोपियन युनियनने कर्मचाऱ्यांना घरून काम करण्यास सांगितले होते. EU इमारती बंद करण्यात आल्या आहेत आणि कार पार्क देखील बंद करण्यात आले आहेत. कथित मारेकऱ्याची चकमक शेरबीक येथील एका कॅफेमध्ये झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्याच्याकडून स्वयंचलित शस्त्रेही सापडली असून ती हत्याकांडात वापरली गेली असावीत. रुग्णालयात नेत असताना त्यांचा मृत्यू झाला. संपूर्ण बेल्जियममध्ये उच्चस्तरीय दहशतवादाचा इशारा जारी करण्यात आला आहे.
दोन स्वीडिश नागरिकांची हत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव ४५ वर्षीय अब्देसलेम असे आहे. युरो 25 क्वालिफायर सामन्यापूर्वी घडलेल्या या घटनेने संपूर्ण युरोपमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी हल्लेखोराचा शोध घेत असताना चाहत्यांना स्टेडियममध्ये राहण्यास सांगण्यात आले. 50,000 प्रेक्षकांची क्षमता असलेले बोडॉइन स्टेडियम त्यावेळी खचाखच भरले होते. मारेकऱ्याने स्वतःला ISIS या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याचे आणि 'अल्लाह का लड़ाका' असल्याचे सांगितले होते. मुस्लिमांच्या वतीने बदला घेत असल्याचा दावा त्यांनी केला. त्यांनी ‘अल्लाहू अकबर’चा नाराही दिला.