नवी दिल्ली : भारतात सध्या क्रिकेट विश्वचषकाचे वातावरण पाहायला मिळत आहे. यातच भारतीय क्रिकेटर रिंकू सिंगने अलिगडमधील आपल्या गावात कुलदेवी मंदिर बांधले, दरम्यान, क्रिकेटर रिंकू सिंग याच्या कुटुंबाची कुलदेवता माँ चौदेरे देवी आहे. रिंकू सिंगने आयपीएल आणि भारतीय क्रिकेट संघातील चांगल्या कामगिरीसाठी कुलदेवीकडे शुभेच्छा मागितल्या होत्या. यासाठी म्हणून रिंकू सिंगने ११ लाख रुपये खर्च करून अलीगढच्या कमालपूर गावात हे मंदिर बांधले आहे.
दरम्यान, रिंकू सिंग हा आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स या संघाचे प्रतिनिधित्व करतो. केकेआरकडून खेळताना रिंकू सिंगला आयपीएलमधील ५ षटकारांनी त्याला ओळख दिली. त्यानंतर आता तो हांगझाऊ येथे झालेल्या १९ व्या आशियाई क्रीडास्पर्धेत भारताकडून खेळला. या स्पर्धेतून विजेता म्हणूनही परतला आहे. दरम्यान, मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले असले तरी मंदिरात मूर्तीचा अभिषेक होणे बाकी आहे.
रिंकू सिंगने आयपीएल २०२३ मध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघासाठी चमकदार कामगिरी केली होती. त्याने अनेक मॅचविनिंग इनिंग्स खेळल्या. गुजरात टायटन्सविरुद्ध त्याने शेवटच्या षटकात पाच षटकार ठोकले. या डावात त्याने 21 चेंडूत 48 धावा केल्या. या कामगिरीनंतर त्याची खूप चर्चा झाली.