नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांनी दि. ०३ ऑक्टोबर रोजी चिनी फंडिंग प्रकरणी न्यूजक्लिकच्या पत्रकारांच्या घरांवर छापेमारी केली. दरम्यान, न्यूजक्लिकचे संस्थापक आणि मुख्य संपादक प्रबीर पुरकायस्थ आणि एचआर प्रमुख अमित चक्रवर्ती यांना UAPA कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली असून ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. याप्रकरणी आता केंद्रीय गुन्हे अन्वेषण शाखा (सीबीआय)कडून "न्यूजक्लिक" विरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे.
दरम्यान, सीबीआयचा आरोप आहे की 'खाजगी कंपनीने एफसीआरए तरतुदींचे उल्लंघन करून चार परदेशी संस्थांद्वारे २८.४६ कोटी रुपये पुरविण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. “खासगी कंपनीने एफसीआरए तरतुदींचे उल्लंघन करून चार विदेशी संस्थांद्वारे २८.४६ कोटी रुपये पुरविण्यात आले होते, असा आरोप आहे. एफडीआय म्हणून फंडाचे चुकीचे वर्णन करून ९.५९ कोटी रुपये (अंदाजे) विदेशी निधीची पावती असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. खाजगी कंपनीच्या संचालकाने त्याच्या जवळच्या सहकाऱ्यांसह विदेशी योगदान (नियमन) कायदा २०१० च्या तरतुदींचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे, असे सीबीआयने निवेदनात म्हटले आहे.
दिल्ली पोलिसांनी मंगळवारी चिनी फंडिंग प्रकरणी न्यूजक्लिकच्या पत्रकारांच्या घरांवर छापेमारी केली. दरम्यान, न्यूजक्लिकचे संस्थापक आणि मुख्य संपादक प्रबीर पुरकायस्थ आणि एचआर प्रमुख अमित चक्रवर्ती यांना UAPA कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली असून ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.
त्यानंतर आता प्रबीर पुरकायस्थ आणि अमित चक्रवर्ती यांच्या अटकेविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी घेण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने सहमती दर्शवली. चीनशी संबंधित संघटनांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली न्यूजक्लिकची चौकशी केली जात आहे. तसेच न्यूजक्लिकवर भारताचे सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडता बाधित करण्याचा कट रचल्याचा आरोप आहे.
यामध्ये न्यूजक्लिकचे संस्थापक प्रबीर पुरकायस्थ, एचआर विभाग प्रमुख अमित चक्रवर्ती आणि अनेक पत्रकार तसेच सामाजिक कार्यकर्त्यांची नावे आहेत. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार, मंगळवारी न्यूजक्लिकशी संबंधित ४६ पत्रकार आणि इतर व्यक्तींची चौकशी करण्यात आली. यावेळी लॅपटॉप, मोबाइल फोन आणि कागदपत्रे जप्त करण्यात आली होती.