मुंबई : राज्यातील सत्ता संघर्ष आणि शिवसेना फुटीच्या दृष्टीने आजची ही सुनावणी अत्यंत महत्त्वाची आहे. आज केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी होणार आहे. गेल्या सुनावणीवेळी निवडणूक आयोगाने शिंदे गटाची बाजू ऐकून घेतली होती. आजच्या सुनावणी ठाकरे गट आपली बाजू मांडण्याची शक्यता आहे. यावेळी दोन्ही गटाचे नेते दिल्लीत उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हबाबत आज निर्णय होणार का? हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.
निवडणूक आयोगापुढे सुनावणी :
दोन्ही गटांनी शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हावर दावा केला आहे. याबाबत आज केंद्रीय निवडणूक निर्णय देण्याची शक्यता आहे. राज्यातील सत्ता संघर्ष आणि शिवसेना फुटीच्या दृष्टीने ही सुनावणी अत्यंत महत्त्वाची आहे. या सुनावणीदरम्यान कपिल सिब्बल, देवदत्त कामत आणि सनी जैन हे ठाकरे गटाच्या बाजूने युक्तीवाद करतील. तर महेश जेठमलानी, मनिंदर सिंह हे शिंदे गटाची बाजू मांडणार आहेत.