तीस्ता सेटलवाडच्या जामीन अर्जावर ३० रोजी सुनावणी

    25-Aug-2022
Total Views | 44
 teesta 
 
 
 
नवी दिल्ली : गुजरात दंगलीमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या गोवण्याचा प्रयत्न करण्यासाठी गुन्हेगारी कट रचण्याचा आरोप असलेली कथित सामाजिक कार्यकर्ती तीस्ता सेटलवाड हिच्या जामीन अर्जावर सर्वोच्च न्यायालयात ३० सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे.
 
 
सध्या तुरुंगवास भोगणाऱ्या तीस्ता सेटलवाडने सर्वोच्च न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला आहे. त्या अर्जावर सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती उदय लळित, न्या. रवींद्र भट आणि न्या. सुधांशू धुलिया यांच्या खंडपीठासमोर गुरुवारी सुनावणी होणे अपेक्षित होते. यावेळी सॉलिसीटर जनरल तुषार मेहता यांनी गुजरात सरकारच्या उत्तरामध्ये सुधारण करण्यासाठी मुदत मागितली. ती मान्य करून सुनावणी पुढे ढकलून ती ३० ऑगस्ट रोजी घेण्याचे निर्देश दिले आहेत.
 
 
तीस्ता सेटलवाड हिच्यावर सर्वोच्च न्यायालयाने गुजरात दंगलीतील पिडितांच्या नावे गैरव्यवहार करण्याचा आणि तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना जाणीवपूर्वक गोवण्यासाठी कट रचल्याचा ठपका ठेवला होता. त्यानंतर गुजरात एटीएसने तीस्ता हिला अटक करून तुरुंगात रवानगी केली आहे. तीस्ता हिने तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे सरकार पाडण्यासाठी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांच्याकडून ३० लाख रुपयांची रक्कम घेतल्याचे एटीएसने नमूद केले आहे.
 
अग्रलेख
जरुर वाचा
विमानाने झेप घेताच २ मिनिटांत काळाचा घाला - अहमदाबादहुन लंडनच्या दिशेने जाणारे विमान कोसळले

विमानाने झेप घेताच २ मिनिटांत काळाचा घाला - अहमदाबादहुन लंडनच्या दिशेने जाणारे विमान कोसळले

अहमदाबादहून लंडनच्या दिशेने झेपावलेले एअरइंडियाचे फ्लाइट नंबर एआय-१७१ हे विमान उड्डाणानंतर अवघ्या २ मिनिटांत तांत्रिक बिघाडामुळे निवासी भागात कोसळले. या भीषण दुर्घटनेत अहमदाबादहून लंडनला निघालेल्या २४२ प्रवासी होते. यात २४१ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. एक प्रवासी जखमी अवस्थेत मिळाला आहे. या २४२ प्रवाशांमध्ये आणि क्रू मेंबर्स, १६९ भारतीय नागरिक, ५३ ब्रिटिश नागरिक, १ कॅनेडियन नागरिक आणि ७ पोर्तुगीज नागरिक होते. या संपूर्ण दुर्घटनेबाबत जगभरातुन शोक व्यक्त करण्यात येत आहे. अत्यंत दुर्दैवी बाब म्हणजे ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121