मुंबई : काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळातील सिंचन घोटाळ्यात तत्कालीन जलसंपदा मंत्री अजित पवारांना क्लीनचिट मिळाली नसल्याचे उघड झाले आहे. बुधवारी सकाळचीच भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी ट्विट करत राष्ट्रवादीचा मोठा नेता तुरुंगवासी होणार असे त्या ट्विटमध्ये म्हटले होते. त्यामुळे आत ते अजित पवारच असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान हे सर्व सूडबुद्धीने सुरु असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात असताना, सरकार सूडबुद्धीने कारवाई का करेल? अजित पवारांनी चौकशीला सामोरे जावे.
अजित पवारांना क्लिनचीट मिळाली नसल्याने त्यांच्यावर कारवाई होणार हे उघड आहे, त्यामुळे जर अजित पवार खरंच निर्दोष असतील तर त्यांनी रीतसर चौकशीला सामोरे जावे, जे काही सत्य असेल ते समोर येईलच अशी मागणी दरेकरांनी केली आहे. विरोधकांकडून सरकारला लक्ष्य केले जाणे हे चुकीचे आहे कारण ही सर्व न्यायालयीन प्रक्रिया आहे अशी प्रतिक्रिया दरेकरांनी दिली आहे.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी कंबोज हा भाजपचा भोंगा असल्याची टीका केली आहे, एखाद्या नेत्याची चौकशी होणार आहे ही बातमी कंबोज यांना आधी कशी काय कळली, ईडीच्या कार्यालयातून त्यांना माहिती पुरवणारा कोण आहे? हे शोधले पाहिजे त्यामुळे उलट कंबोज यांचीच चौकशी केली जावी अशी मागणी मिटकरी यांनी केली आहे.