लांगूलचालन बंद! बिट्टा कराटेच्या पत्नीची सरकारी नोकरीतून हकालपट्टी
13-Aug-2022
Total Views |
जम्मू काश्मीर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार देशात सत्तेवर येताच दहशदवाद्यांचे लाड पुरवणे बंद झाले. त्यामुळे देशात राहून देशविरोधी कटकारस्थान रचणाऱ्यांना चांगलीच जरब बसली आहे. निरपराध काश्मिरी पंडितांची हत्या करणारा कुख्यात दहशदवादी बिट्टा कराटे याच्या पत्नीसह दहशदवाद्यांचे नातेवाईक असलेल्या तिघांना सरकारी नोकरीतून काढून महत्वपूर्ण टाकण्याचा निर्णय,नुकताच जम्मू काश्मीर प्रशासनाने घेतला आहे.
जम्मू काश्मीर मधील क्रूरकर्मा फारुख अहमद डार उर्फ बिट्टा कराटे याची बायको असबाह आरजूमंज खान हिला सरकारी नोकरीवरून काढून टाकण्यात आलेले आहे. काश्मी विद्यापीठात प्रशासकीय अधिकारी असलेली असबाह ही वैज्ञानिक म्हणून तिथे कामाला होती. तिच्या शिवाय हिजबुल मुजाहुद्दीनचा म्होरक्या सय्यद सलाहुद्दीनचा मुलगा अब्दुल माईक याची सरकारी नोकरीतून हकालपट्टी करण्यात आलेली आहे.
तसेच मजीद हुसेन कादरी याच्यासह आणखी एका दहशदवाड्याचा नातेवाईक असलेल्या व्यक्तीला सरकारी नोकरीतून काढून टाकण्याचा निर्णय घेतला गेला. सरकारी नोकरी करताना देशविरोधी कारवाईसाठी दहशदवाद्यांना मदत करण्याचे उद्योग या चौघांकडून सुरु असल्याचा त्यांचावर आरोप आहे. जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी या चौघांना सरकारी नोकरीतून काढून टाकणार असल्याचे जाहीर केले आहे.