मुंबईकरांना एक्सायटल पुरवणार हाय स्पीड इंटरनेट सुविधा

ग्राहकांना अखंड आणि अमर्यादित इंटरनेट सुविधा फक्त ४२३ रुपये महिना दरात होणार उपलब्ध

    05-Jul-2022
Total Views | 105
y

 
 
मुंबई : एक्सायटल ही देशातील सगळ्यात जलद फायबर ब्रॉडबँड इंटरनेट सुविधा देणारी कंपनी आहे. दिल्ली, हैद्राबाद, बँगलोर, अशा शहरांना यशस्वी सेवा पुरवल्या नंतर एक्सायटलने मुंबईमधे सेवा सुरू केली आहे. एक्सायटलने नुकतेच मुंबईकरांसाठी कमी दरात अनलिमिटेड हायस्पीड इंटरनेट प्लॅन लॉन्च केले आहेत. एक्सायटलने मुंबई मधे नवीन ४०० एम बी पी एस अल्ट्रा हाय स्पीड इंटरनेट प्लॅन लॉन्च करणार आहे.
 
 
उकला आणि नेटफलिक्स चा रिपोर्ट नुसार एक्सायटल ही देशातील सर्वात फास्ट इंटरनेट सेवा पुरवणारी कंपनी आहे. एक्सायटल अंधेरी पूर्व, घाटकोपर, चेंबूर, विक्रोळी, मालाड, कांदिवली, गोरेगाव, जोगेश्वरी, मिरारोड दहिसर, बोरिवली, घणसोली, नेरूळ, सानपाडा, खारघर, प्रभादेवी, कार्टर रोड, माहीम, माटुंगा, मुलुंड, भांडुप, आणि ठाणे या ठिकाणी आपली सेवा उपलब्ध करत आहे.
 
 
ब्रॉडबँड इंटरनेट हा आजच्या तंत्रयुगाचा कणा आहे. आपले घर मनोरंजन, ज्ञान हे इंटरनेट वर अवलंबून आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. पण मुंबई मुंबई सारख्या मेट्रो पॉलीटीयन शहरात अत्यंत सामान्य ५० एम बी पी एस इतका इंटरनेट स्पीड पुरवला जातो. म्हणूनच आम्ही मुंबईकरांसाठी कमी दरात २०० ते ४०० एम बी पी एस इतका हायस्पीडइंटरनेट स्पीड पुरवणार आहोत अशी माहिती एक्सायटल चे संचालक विवेक रैना यांनी दिली.
 
 
आजकाल प्रीपेड प्लान्ससोबतच अनेक कंपन्या ब्रॉडबँडमध्ये देखील वेग-वेगळ्या रेंजमध्ये प्लान्स सादर करत असतात. ग्राहकांच्या गरजा लक्षात घेत हे प्लान्स सादर केले जातात. इंटरनेट सेवा पुरवठादार एक्सायटेल ने, फायबर ब्रॉडबँड सेवेचा विस्तार करत आता मुंबईत आपली सेवा सुरू केली आहे. एवढेच नाही तर कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन प्लान आणला आहे. कंपनीने 400 एम बी पी एस सह २०० एम बी पी एस आणि ३०० एम बी पी एस प्लान्स लाँच केले आहेत.
 
 
या प्लानच्या किंमती किती आहेत याबद्दल सविस्तर जाणून घ्या.
एक्सायटेल 200 एम बी पी एस प्लानची मासिक किंमत ६९९ रुपये आहे. परंतु, ३ महिन्यांच्या प्लानसाठी ५९२ रुपये प्रति महिना, ६ महिन्यांच्या प्लानसाठी प्रति महिना ५२२ रुपये आणि १२ महिन्यांचा प्लान एकत्र घेणार्याग ग्राहकांसाठी ४२३ रुपये प्रति महिना आहे.तुम्ही एक्सायटेलचा 300 एम बी पी एस प्लान देखील खरेदी करू शकता. एक्सायटेलच्या प्लानची मासिक किंमत ७९९ रुपये आहे. ३ महिन्यांसाठी प्लान घेतल्यानंतरही दरमहा केवळ ७९९ रुपये आकारले जातात. पण, जर तुम्ही ६ महिन्यांच्या प्लानसाठी गेलात, तर मासिक खर्च फक्त ५४५ रुपये असेल आणि १२ -महिन्याच्या प्लान किंमत ४४९ रुपये प्रति महिना असेल.
एक्सायटेल ४०० एम बी पी एस प्लान
तुम्ही मासिक आणि ३ महिन्यांचा प्लान एकत्र घेतल्यास, या प्लानची किंमत ८९९ रुपये प्रति महिना आहे. परंतु जे युजर्स ६ महिन्यांचा प्लान एकत्र घेतात त्यांना हाच प्लान ६०० रुपये प्रति महिना आणि १२ महिन्यांचा प्लान मिळून ४९९ रुपयांमध्ये मिळेल. ग्राहकांना ONU डिव्हाइससाठी २००० रुपये सुरक्षा ठेव रक्कम भरावी लागेल परंतु कंपनी इंस्टॉलेशनसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारत नाही. याचा अर्थ असा की जेव्हा तुम्ही दीर्घ वैधतेसह प्लान खरेदी करता तेव्हा हे प्लान्स अधिक परवडणारे होतात.
 
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
बांगलादेशात निवडणुका जाहीर, पण लोकशाही धाब्यावर?

बांगलादेशात निवडणुका जाहीर, पण लोकशाही धाब्यावर?

बांगलादेश अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांनी पुढील वर्षी बांगलादेशात निवडणुका होणार असल्याची घोषणा केली. माजी पंतप्रधान शेख हसीना यांना सत्तेतून पदच्यूत केल्यानंतर जेव्हा मोहम्मद युनूस सत्तेत आले, तेव्हा अंतरिम सरकारला विरोधी पक्षांकडून मोठ्या प्रमाणात विरोध झाला. आजही तो कायम आहे. दुसरीकडे, सरकारी कर्मचारी, शिक्षक आणि सैन्य यांच्यात तणाव निर्माण होण्याची चिन्हे आहेत. अशा परिस्थितीत, ढाका मेट्रोपॉलिटन पोलिसांनी सर्व सार्वजनिक सभा, मिरवणुका आणि रॅलींवर अनिश्चित काळासाठी बंदी घातली आहे. युनूस ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121