मुंबई(प्रतिनिधी) : ठाणे जिल्ह्यातील शहापूरच्या दहिवली गावाजवळील वन क्षेत्रात सशस्त्र शिरकाव केल्याबद्दल दोन आरोपींना दि. २२ जुलै अटक करण्यात आली. त्यांच्याकडून एक सिंगल बोर बंदूक आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आली आहे. त्यांना तीन दिवसाची कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच वन विभागाकडून पुढील तपास करण्यात येत आहे.
वन विभागाला मिळालेल्या माहितीनुसार दोन माणसे शिकार करण्याच्या हेतूने वन क्षेत्रात गेल्याचे लक्षात आले. गस्तीवर असलेल्या वनक्षेत्रपालांनी या माणसाना अडवून त्यांची चौकशी केली. चौकशी अंती, शिकारीच्या हेतू ने जंगलात फिरत असल्याचे त्यांनी काबुल केले. गुरुदेव डाकी आणि शंकर शिद असे अटक केलेल्या आरोपींची नवे आहेत. त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. आरोपींना तीन दिवसाची कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच या गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे. पुढिल तपास वनपरिक्षेत्र अधिकारी शैलेश गोसावी करित आहेत. या कारवाईमध्ये वन विभागाचे संदिप जाधव, चंद्रप्रकाश मौर्या, रामहरी तांबडे, भाऊराव भांगरे, धुलंगुंडे, वनरक्षक खैरे व वाहनचालक भरत निचिते उपस्थित होते.