कोई नहीं है टक्कर में: पंतप्रधान मोदींचे कॉमनवेल्थ खेळाडूंना प्रेरणादायी भाषण

    20-Jul-2022
Total Views | 44
Modi
 
 
 
 
 
 
नवी दिल्ली: "तणाव न ठेवता तुमच्या सर्व ताकदीनिशी चांगले खेळा. 'कोई नहीं है टक्कर मे, क्यूँ पडे हो चक्कर मे' असे पंतप्रधान मोदी भारताच्या राष्ट्रकुल संघाला म्हणाले. लंडनच्या बर्मिंगहॅम येथे दि. २८ जुलै रोजी सुरू होणार्‍या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२२मध्ये जाणार्‍या भारतीय खेळाडूंशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हर्च्युअल माध्यमातून संवाद साधला. कार्यक्रमादरम्यान क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर देखील उपस्थित होते, त्यांनी भारतीय खेळाडूंना सतत पाठिंबा दिल्याबद्दल पंतप्रधान मोदींचे कौतुक केले.
 
 
क्रीडापटूंशी बोलताना पंतप्रधान मोदी यांनी दि. २० जुलै हा दिवस आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस म्हणून कसा ओळखला जातो यावर प्रकाश टाकला आणि ज्या दिवशी राष्लाट्रकुल क्रीडा स्पर्धेला सुरुवात होईल त्या दिवशी तामिळनाडूमध्ये जागतिक बुद्धिबळ ऑलिम्पियाड सुरू होणार आहे, तेव्हा सर्व भारतीय खेळाडूंना आपले कौशल्य सिद्ध करण्याची ही मोठी संधी आहे.
 
 
"आज २० जुलै आहे, क्रीडा जगतासाठी हा एक अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. तुमच्यापैकी काहींना हे माहित असेल की आज आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस देखील आहे. बर्मिंगहॅममध्ये 2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेला सुरुवात होणार आहे हे देखील खूप मनोरंजक आहे. २० जुलै, त्याच दिवशी, तामिळनाडूच्या महाबलीपुरममध्ये, बुद्धिबळ ऑलिम्पियाडला सुरुवात होणार आहे. येत्या १०-१५ दिवसांत भारतीय खेळाडूंना आपले कौशल्य जगासमोर सिद्ध करण्याची सुवर्णसंधी आहे. माझ्या प्रत्येक खेळाडूला खूप खूप शुभेच्छा. तुमच्यापैकी अनेकांनी अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करून देशाचा गौरव केला आहे," असे अनुराग ठाकूर म्हणाले. सत्राच्या सुरुवातीला, क्रीडा मंत्री अनुराग यांनी मोदींनी भारतीय खेळाडूंना सतत पाठिंबा आणि प्रोत्साहन दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121