उत्तर प्रदेश: प्रयागराजमध्ये झालेल्या हिंसाचार घटनेचा सूत्रधार मोहम्मद उर्फ जावेद पंपच्या घरावर बुलडोझरने कारवाई करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशात झालेल्या हिंसाचार प्रकरणी यूपीच्या योगी सरकारने मोठी कारवाई केली आहे. शहरातील दगडफेकीचा मुख्य सूत्रधार जावेद अहमद उर्फ जावेद पंप याच्या घरावर बुलडोझर चालवला आहे.
जावेद पंप याचे घर कारेलीच्या जेके आशियाना परिसरात आहे. पीडीएकडून नकाशा मंजूर न करता जावेदचे घर नियमाविरुद्ध बांधले आहे. या कारणास्तव रविवारी १२ जून रोजी घर पाडण्यात आले. तोडफोडीच्या कारवाईपूर्वी परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यासोबतच अधिकाऱ्यांनी पोलिसांना कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज राहण्यास सांगितले आहे.
अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रेम प्रकाश यांनी शुक्रवारी (१० जून रोजी ) सांगितले होते की ज्यांनी हिंसाचाराचा कट रचला त्यांची चौकशी केली जात आहे. तपासात ज्यांचा सहभाग असेल, त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.