'मतदान ठाकरे सरकारला, पण हिंदुत्वाला नाही'; अबू आझमींची डबलढोलकी

    10-Jun-2022
Total Views | 106
 
Abu Azmi
 
 
 
मुंबई : "आघाडी सरकार पुर्णतः हिंदुत्वाच्या विचारांना अनुसरुन असतं, तर त्यात राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे दोन पक्ष कसे असते? ते तर सेक्युलर पक्ष आहेत. त्यामुळे माझं मत आघाडी सरकारला जरी असलं तरी उघडपणे हिंदुत्वाला नसेल.", असं वक्तव्य समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी केले. शुक्रवारी (दि. १० जून) राज्यसभा निवडणुकीच्या मतदानासाठी विधानभवनात हजर झाले असता ते पत्रकारांशी बोलत होते. 
 
 
 
"महाविकास आघाडी भाजपच्या विरोधात उभी आहे. त्यामुळे माझं मत हे महाविकास आघाडीलाच असेल. येणाऱ्या तीस वर्षांत सेक्युलर सरकार चालवू असं वचनही या सरकारने दिलंय. आमचं मत आघाडी सरकारला जरी असलं तरी हिंदुत्वाला नसेल. कारण जर आघाडी सरकार पुर्णतः हिंदुत्वाच्या विचारांना अनुसरुन असतं, तर त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे दोन पक्ष कसे असते? ते तर सेक्युलर पक्ष आहेत.", असे अबू आझमी यांचे म्हणणे आहे.  
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121