साताऱ्याच्या सड्यावरून नव्या वनस्पतीचा शोध!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Jun-2022   
Total Views |
 
 
 
NEW FLOWER IN SATARA
 
 
 
 
मुंबई(प्रतिनिधी): सातारा जिल्ह्यातील पठरांवरून एका प्रदेशनिष्ठ वनस्पती प्रजातीचा शोध लावण्यात आला आहे. 'लेपिडागेथिस महाकस्सपेयई' ही 'अक्यांथेसी' कुळातील वनस्पती शोधण्यात आली आहे. याबाबतचा शोधनिबंध 'नॉर्डिक जर्नल ऑफ बॉटनी' ह्या जागतिक जर्नलमध्ये नुकताच प्रकाशित करण्यात आला. यातून पाठरांवरच्या जैवविविधतेचे महत्व पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे.
 
 
 
 
बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी 'बीएनएचएस' तर्फे साताऱ्यातील उंचावरील पठारांचा अभ्यास सन २०१९ पासून सुरू आहे. पठरांवरील वनस्पतींचा अभ्यास करताना संशोधकांना लेपिडागेथिस जिनस मोडणारी एक विलक्षण वनस्पती आढळून आली. त्यानंतर या वनस्पतीचा सर्व ऋतुंमध्ये अभ्यास करण्यात आला. त्याच बरोबर या वनस्पतीचे नमुने गोळा करण्यात आले. आणि मायक्रोस्कोपखाली त्यांचा अभ्यास करण्यात आला. तसेच भारतातील लेपिडागेथिस जिनस मधील इतर जातींबरोबर या वनस्पतीला जुळवून बघण्यात आले. परंतु, या वनस्पतीचे अस्तित्व इतर कुठेही सापडले नाही. ही वनस्पती केवळ महाराष्ट्रातील साताऱ्याच्या पठारावरच आढळून येते असा निष्कर्ष संशोधकांनी प्रसिद्ध केला.
 
 
 
 
 
ही वनस्पती साताऱ्यातील सपाट पठारांवर एखाद्या चटई सारखी पसरट वाढते . तसेच ती अडीच मीटर पर्यंत वाढू शकते. ही वनस्पती 'अक्यांथेसी' कुळातील असून कारवी सारख्या 'मोनोकार्पीक' वनस्पतींच्या श्रेणीत मोडते. या वनस्पतींचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या संपूर्ण जीवनात त्या एकदाच फुलतात. ही फुले मार्च महिन्यात फुलण्यास सुरुवात होते. त्यानंतर फुलांचे फळात रुपांतर होते. या फळांमध्ये बिया साठवून ठेवलेल्या असतात. हे फळ पहिल्या पावसानंतर एखाद्या फटाक्यासारखे फुटते. आणि त्यातील बिया मूळ रोपापासून थोड्या अंतरावर कातळाच्या खोबणीत जाऊन अडकतात. असे घडल्यावर मूळ रोप सुकून मारून जाते. पावसाला झालेली सुरवात ही या बियांसाठी पोषक असते. हे असे चक्र सतत चालू असते. ही नव्याने शोधण्यात आलेली वनस्पती आययुसीएन लाल यादीत 'एनडेंजरड' गटात अनुसूचित आहे. पठारांवर लावल्या जाणाऱ्या आगी , वेगवेगळ्या प्रकारची बांधकामे या समस्यांना तोंड देत ही वनस्पती फुलते आहे. परंतु महाराष्ट्रात फक्त सातारा जिल्ह्यातील पठारांवर आढळणाऱ्या या वनस्पतीचे जतन कारायला हवे.या संशोधन कार्यात पार्ले टिळक विद्यालयाचे साठे कॉलेज मधील सुशांत मोरे, शरद कांबळे, मंदार सावंत, रोहित माने आणि हर्षल भोसले यांनी सहभाग घेतला होता. आणि या संशोधन कार्याला ब्रिहद भारतीय समाज यांनी आर्थिक साहाय्य केले होते.
 
 
 
 
 
का दिले हे नाव?
 
 
 
 
बुद्धांचे धुतांगधारींमध्येअग्र शिष्य मगध मधील ब्राम्हण कुटुंबातील पिप्पली मानव , नंतर महाकस्सप (महाकाश्यप) ह्या नावाने ओळखले गेले ह्यांच्या उपकारांसाठी आणि सन्मानाप्रीत्यर्थ त्यांचे नाव ह्या वनस्पतीस देण्यात आहे.
 
 
 
 
 
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@