मुंबई (विशेष प्रतिनिधी) - सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळ्यात मंगळवारी दि. २९ जुलै रोजी पार पडलेल्या नागपंचमी उत्सवात नागांसोबत खेळ झाल्याचे चित्र दिसले (shirala nagpanchami). जनजागृतीच्या नावाखाली सापांना भरचौकात आणून त्यांच्यासोबत खेळ खेळल्याचे व्हिडीओ समाजमाध्यमांवर प्रसिद्ध झाले आहेत (shirala nagpanchami). यावर वन्यजीवप्रेमी कार्यकर्त्यांनी ताशेरे ओढले आहेत. (shirala nagpanchami)
सोमवार दि. २९ जुलै रोजी महाराष्ट्र वन विभागाने सांगलीच्या शिराळ्यात पारंपारिक पद्धतीने नागपंचमी साजरी करण्यासाठी परवानगी देण्यात आली. यासाठी प्रधान मुख्य वनसंरक्षकांच्या कार्यालयातर्फे सांगलीच्या उपवनसंरक्षकांना पत्र देण्यात आले. यामध्ये २१ मंडळाने परवाने देऊन त्यामाध्यमातून प्रत्येक एक नाग पकडण्याची परवानगी देण्यात आली. शैक्षणिक कारणासाठी सापांबद्दल सापांबद्दल पारंपारिक ज्ञान स्थानिक युवा पिढीला मिळली आणि त्यामाध्यमातून परिसंस्थेतील सापांचा स्थान त्यांना समजावे, या कारणासाठी परवानगी देण्यात आली. २७ जुलै ते ३१ जुलै या कालावधीत सापांना पकडावे, असे पत्रात नमूद करण्यात आले. पत्राच्या सुरुवातीलाच हंटिंग या शब्द वापरल्याने शैक्षणिक कारणांसाठी वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत संरक्षित असलेला प्राणी पकडण्याची परवानगी कशी देण्यात आली, याविषयी वन्यजीवप्रेमी कार्यकर्त्यांनी प्रश्न विचारले आहेत. मंगळवारी शिराळ्यात पार पडलेल्या नागपंचमी उत्सवात नागांसोबत खेळ झाल्याचे व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल देखील झाले आहेत.