मुसेवाला यांना भावपूर्ण वातावरणात निरोप : चाहत्यांना शोक अनावर

    31-May-2022
Total Views | 38

siddhu 
 
 
 
चंडीगड : प्रसिद्ध गायक सिद्धू मुसेवाला यांची रविवार दि. २९ मे रोजी  सायंकाळी  पंजाबच्या  मानसा जिल्ह्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मंगळवार दि. ३१ मे रोजी मुसेवाला यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. कुटुंबाने मूसा गावात त्यांच्या वडिलोपार्जित शेतजमिनीवर हा विधी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, गावकरी, गुरदास मान यांसारखे प्रख्यात गायक आणि पंजाब काँग्रेसचे प्रमुख अमरिंदर सिंग राजा वारिंग आणि आमदार सुखजिंदर रंधावा यांच्यासह त्याचे अनेक चाहते मुसेवाला यांना अखेरचा निरोप देण्यासाठी जमले होते. 
  
 
त्यांना निरोप देण्यासाठी चाहत्यांना अश्रू अनावर झाले. गावातील नागरिकांनी सिद्धूच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. हत्येप्रकरणी पंजाब पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे. अधिका-यांच्या म्हणण्यानुसार, दिल्ली पोलिसांनी तुरुंगात असलेल्या गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईची या प्रकरणात चौकशी सुरु केली आहे.
 

 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
इराण

इराण 'होर्मुझ'चा जलमार्ग बंद करण्याच्या तयारीत! भारतासह जगाच्या व्यापारावर काय परिणाम होणार? वाचा सविस्तर...

Strait of Hormuz : इराण आणि इस्त्रायल यांच्यात सुरु असलेल्या सशस्त्र संघर्षात अमेरिकेने उडी घेतल्याने जगभरात खळबळ उडाली आहे. अमेरिकेच्या या हल्ल्यांनंतर चवताळलेल्या इराणने प्रत्युत्तर म्हणून इस्त्रायलच्या दहा शहरांवर क्षेपणास्त्रांचा जोरदार मारा केला आहे. यानंतर इराण कच्चे तेल आणि वायूच्या व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाचा जलमार्ग असलेली होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याची भूमिका घेण्याच्या विचारात असल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र, आता इराणच्या कायदेमंडळाने होर्मुझ सामुद्रधुनीच्या नाकेबंदी निर्णयाला मान्यत..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121