जगाची महासत्ता म्हणून ओळखली जाणारी अमेरिका ही सध्या तेथील नागरिकांच्या वर्तनाने सध्या चर्चेत आहे. अमेरिकेत होणार्या गोळीबाराच्या घटना या तशा कायमच चर्चेत असतात. नुकतेच अमेरिकेतील टेक्सासमधील प्राथमिक शाळेत झालेल्या गोळीबारामुळे अशा घटनांची कारणे आणि स्रोत काय आहेत आणि ते कसे थांबतील, याबाबात विचारमंथन होणे आता आवश्यक आहे. अमेरिकेत ही परिस्थिती नेमकी कशामुळे निर्माण झाली, याबाबत जगभरात सध्या सुरू आहे. जगभरात याबाबतच्या चर्चा सध्या सुरू आहे. अमेरिकेतील एका घटनेत एक १८ वर्षांचा मुलगा बाजारातून बंदूक विकत घेतो, आजीला गोळ्या घालतो, मग शाळेत जातो आणि अंदाधुंद गोळीबार सुरू करतो, अशी घटना घडली आहे.
१९ मुले आणि इतर दोन प्रौढांना मारल्यानंतर या मुलाचाही मृत्यू झाला. पण खेदाची बाब म्हणजे, या बेलगाम गोळीबाराचे नेमके कारण काय, हे शोधणे कठीण आहे. निश्चितपणे तेदेखील प्रथमदर्शनी हा गुन्हा आहे आणि हल्लेखोर बचावात्मक चकमकीत मारला गेला, पण असे हल्ले सर्रास का होत आहेत, याचा विचार अमेरिकन सरकार आणि समाजाने करण्याची वेळ आली आहे. प्रश्न असा आहे की, जर एखाद्या अपरिपक्व बुद्धीच्या तरुणाने प्राणघातक बंदूक सहज मिळवली, तर अशा हल्ल्यामागे काय आधार असेल आणि त्याचे काय फायदे होतील, हे सांगण्यासाठी हे पुरेसे नाही का? समाज आणि व्यवस्थेच्या दृष्टीने अमेरिका बहुस्तरीय आव्हानांना तोंड देत असल्याचे दिसते.
तारुण्यात नीट न पोहोचलेला तरुण संवेदनाहीन होतो, मग त्याच्या मुळाशी काय आहे? परिस्थिती काय आहे? आठ-दहा वर्षांच्या लहान मुलांना गोळ्या घालण्यात त्यांना कोणताही संकोच का वाटत नाही, हेच प्रश्न येथे उपस्थित होतात. अमेरिकेत कुणालाही आणि विशेषत: बंदुका व घातक शस्त्रे सर्वसामान्यांना सहज उपलब्ध आहेत, हे उघड आहे. अशा रीतीने लोकांकडे एखादे प्राणघातक शस्त्र असेल किंवा ते कोणत्याही अडथळ्याशिवाय मिळाले, तर पहिली चूक व्यवस्थेचीच म्हणावी लागेल. एकीकडे सहज उपलब्ध होणारी शस्त्रे आणि दुसरीकडे विनाकारण बेलगाम चालणारे काही लोक, अशा स्थितीत परिणामाचा अंदाज बांधणे फारसे अवघड नाही.
‘टेक्सास’च्या ताज्या घटनेत ज्या मुलाने गोळीबार केला, तो एक प्रातिनिधिक उदाहरण नाही आणि सर्व लोक असे नसतात. पण प्रश्न असा आहे की, असे काही लोक आहेत आणि बंदुका किंवा प्राणघातक शस्त्रे खुल्या बाजारात सहज उपलब्ध होत असतील, तर परिस्थिती शांततेची कशी निर्माण होईल! स्थिती अशी आहे की, या वर्षभरात केवळ अमेरिकेत अशा प्रकारच्या २७ छोट्या-मोठ्या घटना समोर आल्या आहेत, ज्यात १०० हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. ही बाब गंभीर म्हणावी अशीच.
एकप्रकारे बंदूक संस्कृतीमुळेलोकांना विनाकारण जीव गमवावा लागतो. ‘टेक्सास’मधील गोळीबार ही अशाच घटनांची मालिका आहे. अलीकडेच, न्यूयॉर्कमधील बफेलो येथे एका किराणा दुकानात बेपर्वा गोळीबारात दहा कृष्णवर्णीय लोक ठार झाले. या अमेरिकेत अशा घटना वारंवार घडत असल्याच्या पार्श्वभूमीवर बंदूक संस्कृतीवर नियंत्रण आणायला हवे, अशी मागणी होत आहे, हे वेगळे सांगायला नको. ताज्या घटनेनंतर खुद्द अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनीही सांगितले की, बंदुकांच्या विक्रीचे समर्थन करणार्यांच्या विरोधात आम्ही कधी उभे राहणार? प्रश्न असा आहे की, जर अमेरिकेत शस्त्रे ठेवण्यावर काटेकोरपणा किंवा निर्बंध नाहीत, तर त्यांच्यामार्फत होणार्या हल्ल्यांपासून लोकांना वाचवण्याची यंत्रणा काय आहे? सत्य हे आहे की, अमेरिका आणि त्याच्या समाजाने बंदूक ठेवण्याच्या संस्कृतीमुळे बरेच काही गमावले आहे. परंतु, आतापर्यंत काहीही सकारात्मक मिळालेले नाही.