मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याविरोधात मंगळवारी (दि. ०५ एप्रिल) ईडीकडून कारवाई करण्यात आली. त्यांच्या अलिबाग आणि मुंबईमधील मालमत्ता जप्त केल्याचे उघड झाले आहे. अलिबागमधील आठ भूखंड, काही मालमत्ता आणि दादरमधील एक फ्लॅट ईडीकडून जप्त करण्यात आला आहे. संजय राऊतांनी मनी लाँड्रिंगच्या पैशातून संपत्ती खरेदी केल्याचे ईडीकडून सांगण्यात येत आहे.
संजय राऊत यांचे निकटर्तीय प्रवीण राऊत यांना गोरेगाव येथील पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ईडीकडून अटक करण्यात आली होती. या घोटाळ्यातील पैसा संजय राऊत यांनी अलिबागमधील मालमत्ता खरेदी करण्यासाठी वापरला असल्याची शक्यता ईडीकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे ईडीने ही कारवाई केल्याचे दिसून येत आहे.