नवी दिल्ली: गृह मंत्रालयाने इस्लामिक रिसर्च फाउंडेशनला (IRF) बेकायदेशीर संघटना म्हणून घोषित केले आहे. आयआरएफ, देशासाठी धोका असल्याचे घोषीत करून तिच्यावर पाच वर्षांसाठी बंदी घातली. IRF संस्थापक झाकीर नाईक आक्षेपार्ह भाषणात दहशतवाद्यांचे कौतुक करतो. तर मुस्लिमांना दहशतवादी बनण्यास सांगतो. गृह मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, नाईक मुस्लिम तरुणांना भारतात आणि परदेशात दहशतवादी कृत्ये करण्यास प्रवृत्त करत आहे. झाकीरने हिंदू, हिंदू देव आणि इतर धर्मांबद्दल अपमानास्पद टिप्पणी देखील पोस्ट केली आहे, जी इतर धर्मांना अपमानास्पद आहे.