मुंबई : विधीमंडळात अर्थसंकल्पीय अधिवेशनात संमत झालेल्या विधेयकानुसार महान व्यक्तींची तसेच गड- किल्ल्यांची नावे राज्यातील दारू विक्री करणाऱ्या दुकानांस देण्यास मनाई करण्यात आलेली आहे. दुकानांचे फलकसुद्धा मराठीतच असणे आता बंधनकारक असणार आहे. याबाबतचा कायदा अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंजूर झाला होता त्यात आता सुधारणा करण्यात आलेली आहे.
याआधी ज्या दुकानांमध्ये १० पेक्षा कमी कामगार आहेत अशा दुकानांना मराठी भाषेत फलक लावण्याची सक्ती नव्हती पण आता सर्व दुकानांना मराठीतच फलक लावणे बंधनकारक असणार आहे. राज्यपालांनी या विधेयकावर स्वाक्षरी केल्यामुळे आता त्याचे कायद्यात रूपांतर झाले आहे.