लखनऊ : उत्तर प्रदेशात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लखनऊमध्ये शनिवार, दि. ५ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेची भूमिका व एकूण निर्णयाबाबत माहिती दिली. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष असून, या निवडणुकीत शिवसेना ५० ते ६० उमेदवार उतरवत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. विधानसभा निवडणुकीनंतर लोकसभा निवडणूक लढवण्यासाठीची तयारी करत असल्याचा दावाही़ त्यांनी पुढे केला.