कृष्ण जन्मभूमीचेही होणार सर्वेक्षण, मथुरा न्यायालयाचा महत्वाचा आदेश

न्यायालयीन ‘अमीन’ तयार करणार जागेचा आराखडा

    24-Dec-2022
Total Views | 66
मथुरा


नवी दिल्ली
: मथुरेच्या श्रीकृष्ण जन्मस्थान आणि शाही इदगाह मशीद वादाच्या प्रकरणी हिंदू सेनेच्या दाव्यावर दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर (३) यांनी ईदगाहच्या ‘अमीन’ सर्वेक्षणाचे आदेश दिले आहेत. न्यायालयाने २० जानेवारीपर्यंत हे सर्वेक्षण पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.

मथुरा स्थानिक न्यायालयाने हिंदू सेनेच्या याचिकेवर सुनावणी करताना शनिवारी कृष्ण जन्मभूमी-शाही ईदगाह प्रकरणात वादग्रस्त जागेचे सर्वेक्षण करण्याचा आदेश दिला आहे. न्यायालयाने सर्व पक्षकारांना नोटीस बजावून न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यास सांगितले आहे. सर्वेक्षण अहवाल २० जानेवारी रोजी न्यायालयात सादर केला जाणार आहे. न्यायालयाने हिंदूंच्या दाव्यावर 'अमीन'ने सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत.

याविषयी काशी विश्वनाथ प्रकरणातील वकील आणि मथुरा प्रकरणीदेखील युक्तीवाद करणारे वकील विष्णू शंकर जैन यांच्याशी दैनिक ‘मुंबई तरुण भारत’ने संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, न्यायालयाच्या हा आदेश आणि ज्ञानवापी प्रकरणातील आदेश यामध्ये फरक आहे. श्रीकृष्णजन्मभूमी प्रकरणी न्यायालयाने अमीन सर्वेक्षण करण्याचा आदेश दिला आहे. म्हणजे दिवाणी न्यायालयाने श्रीकृष्णजन्मभूमीच्या जागेचा आराखडा तयार करण्यासाठी न्यायालयीन ‘अमीन’ नेमण्याचे आदेश दिला आहे. या सर्वक्षणामध्ये कोणाच्या ताब्यात किती जमीन आहे, याचे सर्वेक्षण केले जाणार आहे. तर ज्ञानवापी प्रकरणामध्ये न्यायालयाने ज्ञानवापी संकुलाचे व्हिडीओ सर्वेक्षण करण्याचा आदेश दिला होता, असे जैन यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.




 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121