आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याबाबत शिंदे गटातील 'या' नेत्याचा मोठा खुलासा !

    23-Nov-2022
Total Views | 81


आदित्य ठाकरे
 
 
 
पाटणा : शिवसेना नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी बुधवारी पाटण्यात बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची भेट घेतली. यामुळे भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. दोन्ही नेत्यांच्या या भेटीत नेमके काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आदित्य ठाकरे आणि तेजस्वी यादव यांच्या भेटीबाबत मंगळवारी माहिती देण्यात आली होती.
 
 
असा असेल दौरा...
 
 आदित्य ठाकरे हे बुधवार दिनांक २३ नोव्हेंबर २०२२ रोजी एक दिवसीय बिहार दौऱ्यावर जातील. बिहारची राजधानी पाटणा येथे ते राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची सदिच्छा भेट घेणार आहेत. या दौऱ्यात शिवसेना सचिव आणि खासदार अनिल देसाई तसंच शिवसेना उपनेत्या खासदार प्रियंका चतुर्वेदी आणि इतर काही प्रमुख पदाधिकारीही आदित्य ठाकरे यांच्यासोबत उपस्थित असतील.
 
 
 
 
 
 
 
 
या भेटीमुळे महाराष्ट्र आणि बिहारच्या राजकारणाला नवे वळण लागले आहे. यावरून नरेश म्हस्के यांनी आता आदित्य ठाकरे यांच्या बिहार दौऱ्यावर प्रतिक्रिया दिली आहे. म्हस्के म्हणाले, "मुंबईत उत्तर भारतीय विशेषत: बिहारी नागरिकांची संख्या मोठ्याप्रमाणावर आहे. मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत बिहारी समाजाची मते आपल्याला मिळावीत, यासाठी आदित्य ठाकरे यांनी बिहारचा दौरा काढला असावा, अशी शक्यता नरेश म्हस्के यांनी वर्तविली. एकनाथ शिंदे साहेबांसोबत बाळासाहेबांच्या विचाराला मांडणारा मतदार आला आहे. ज्याप्रमाणे लोकप्रतिनिधींनी ठाकरे गटाची साथ सोडली. तसेच बाळासाहेब ठाकरेंना मानणाऱ्या मतदारांनीही त्यांची साथ सोडली आहे. तेजस्वी यादव यांचे पिताश्री लालू प्रसाद यादव यांनी कायमच शिवसेनेला विरोध केला. ते नेहमी बाळासाहेब ठाकरे यांच्याविरोधात बोलायचे. आता हीच लोकं आदित्य ठाकरे यांना जवळची वाटत आहेत. खरंतर तेजस्वी यादव यांनी आदित्य ठाकरे यांना भेटण्यासाठी मुंबईत आले पाहिजे होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत पंतप्रधानांना भेटण्यासाठी जातात तेव्हा त्यांच्यावर टीका केली जाते. मग आता आदित्य ठाकरे स्वत:हून परराज्यातील उपमुख्यमंत्र्यांना भेटायला जात आहेत. त्यांच्यावर काय वेळ आली आहे. कदाचित आदित्य ठाकरे यांचा दौरा बिहारमध्ये एखादे पेंग्विन पार्क काढण्यासाठी असेल, अशी खोचक टिप्पणीही नरेश म्हस्के यांनी केली."
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121