उच्च रक्तदाब आणि मधुमेह रुग्ण जास्त

नॅचरोपॅथी पध्दतीने केले उपचार

    02-Jan-2022
Total Views | 83
 
 
bjp shibir
 
 
 
डोंबिवली : भारतीय जनता पार्टी, धर्मराज फाऊंडेशन व ओरॅकल नॅचरोपॅथी रुग्णालय,पुणो यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबीरात उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचे रुग्ण जास्त आढळून आले. या रुग्णांवर नॅचरोपॅथी पध्दतीने औषधोपचार करण्यात आले आहेत.

भाजपा डोंबिवली ग्रामीण सरचिटणीस रविंद्र पाटील आणि भाजपा निळजे लोढा पलावा शहर अध्यक्ष महेंद्र पाटील यांच्यातर्फे दोन दिवसीय आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी हनुमान मंदिर निळजे गाव आणि गांवदेवी मंदिर निळजेपाडा तर रविवारी रामभाऊ भिसे विद्यामंदीर, लोढाहवन येथे शिबीराचे आयोजन केले होते. या शिबीराचा दोनशे हून अधिक नागरिकांनी लाभ घेतला. त्याममध्ये हदयाचे कार्य तपासणी, हदयरोग, उच्चरक्तदाब, धाम लागणो, मेंदूचे कार्यतपासणी, मुंग्या येणो, चक्कर येणो, झोप न येणो, प्रतिकार शक्ती तपासणी, थकवा, नैराश्य, मनोविकार, त्वचेचे कार्य तपासणी, फोड येणो, सोरायसिस, वांग, फुफ्फुसाचे कार्य तपासणी, अस्थमा , छातीत दुखणो, मूत्रपिंडाचे कार्यतपासणी, शारीरीक गुणवत्ता तपासणी, पचनाचे तपासणी अपचर, गॅसेस, मूळव्याध इत्यादी तपासणी करण्यात आल्या. या तपासणीमध्ये जे नागरिकामध्ये काही समस्या आढळून आल्यास सर्व आजारावर निसर्ग उपचार व फिजीओथेरपी पध्दतीने उपचार करण्यात आले. तसेच नागरिकांना आरोग्यविषयक समस्येची कोणतेही लक्षणो दिसत नसली तरी तपासणी करून घ्यावी असे आवाहान के ले होते. त्या आवाहानाला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.

डॉ. सुनील चव्हाण म्हणाले, निसर्गोपोचार पध्दतीने रुग्णावर उपचार करीत आहे. या शिबीरात आलेल्या काही रुग्णांना त्यांना उच्च रक्तदाब आणि मधुमेह आहे हे माहीत नव्हते. या शिबीरात तपासणी केल्यावर त्यांना त्यांच्या समस्यांची माहिती झाली आहे. प्रत्येक घराघरात मधुमेही रुग्ण आहेत. त्यांना योगा करण्याचा सल्ला दिला जातो. तीन ते चार गावात हा कार्यक्रम केला आहे. अजून ही गावात जाऊन निसर्गोपचार पध्दतीविषयी जनजागृती करणार आहे. 48 तासात निसर्गोपचार पध्दतीने रुग्णाला आराम देण्याचा प्रयत्न केला जातो. रुग्ण औषधोपचार पध्दतीला किती प्रतिसाद देतो त्यानुसार कमीत कमी कालवधीत रुग्ण बरा होत असतो असे सांगितले.

रविंद्र पाटील म्हणाले, देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी बाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त हे आरोग्य शिबीर आयोजित केले होते. दोन दिवसीय शिबीराचा अनेक नागरिकांनी लाभ घेतला आहे असे सांगितले.

या शिबीराला वॉर्ड अध्यक्ष चंद्रकांत शिंदे, ओबीसी जिल्हाध्यक्ष लक्ष्मण पाटील, माजी सरपंच प्रकाश पाटील, जयदास पाटील, कृष्णामूर्ती, निवृत्ती पाटील, विश्वनाथ रसाळ, सतीश सिंग, जयेश गोरे, अजित सिंग, आदी मान्यवर उपस्थित होते.
 
-------------------------------------------------------------
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121