ठाण्यात आढळले 'डेल्टा' प्लसचे रुग्ण

    09-Aug-2021
Total Views | 109

Thane_1  H x W:
 
 
ठाणे : कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना जिल्यात नियम शिथिल होत असताना जिल्यात 'डेल्टा प्लस'चे चार रुग्ण आढळून आले आहे.एकप्रकारे हा कोरोना म्युटेशनचा प्रकार असून हे चार रुग्ण डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहेत.सध्या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. नागरिकांनी भीती व्यक्त करू नये.पण काळजी घ्यावी लसीरकण करून घ्यावे,आणि राज्य शासनाच्या त्रिसूत्री नियमांचे पालन करावे.असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलाश पवार यांनी यावेळी केले.
 
 
ठाणे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट होत असतानाच राज्यात कोरोनाच्या डेल्टा प्लस या नव्या विषाणुचे संकट घोंगावू लागले आहे. ठाणे जिल्ह्यात डेल्टा प्लसचे चार रुग्ण आढळल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रसारला रोखण्यात यश मिळविल्यानंतर या नव्या संकटाने ठाण्यातील वैद्यकीय क्षेत्रातील मंडळींची झोप उडाली आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात ३ तर नवी मुंबई महापालिका क्षेत्रात एक रुग्ण सापडल्याने चिंता पसरली आहे.
 
 
 
२५ वर्षा खालील २ जण तर ५६ वर्षा खालील दोन जण बाधित झाले असून यामध्ये दोन महिला आणि दोन पुरुष यांचा समावेश आहे.जून महिन्यात एक तर आणि जुलै महिन्यात तीन जण सापडले होते.त्यानंतर त्याची तपासणी नमुने दिल्लीला पाठवण्यात आले असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलाश पवार यांनी सांगितले. दरम्यान,रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची तपासणी केली जात आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका पाहता ठाणे जिल्हात आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून सोशल डिस्टन्स आणि इतर आवश्यक यी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121