आंदोलनकर्त्यांवर बेछूट गोळीबार; दोघांचा मृत्यू
काबूल : ‘आम्ही कोणावरही सूड उगवणार नाही. सर्वांना माफ केले,’ असा दावा करणार्या तालिबानचा खरा चेहरा अखेर सर्वांसमोर उघडकीस आला आहे.अफगाणिस्तान सरकारचे समर्थन करत आपल्या राजवटीविरोधात निदर्शने करणार्या नागरिकांविरोधात तालिबानच्या फौजेने बेछूट गोळीबार केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. यात दोन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती असून अनेक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येते. तालिबानच्या या कृत्याविरोधात जगभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
19 ऑगस्ट या अफगाणिस्तानच्या स्वातंत्र्य दिवसानिमित्त काबूल शहरात काही नागरिकांकडून अफगाणिस्तानचा राष्ट्रध्वज फडकविण्यात आला होता. विद्यमान तालिबानच्या राजवटीत अनेक प्रकारचे अत्याचार होत असून याविरोधात आंदोलन करण्यासाठी काही नागरिकांनी गर्दी केली होती. मात्र, तालिबानच्या फौजांना याची कुणकुण लागली. सशस्त्र तालिबानचा खरा चेहरा अखेर उघडतालिबानी फौजांनी येथे बेछूट गोळीबार सुरू केला. गोळीबारानंतर सर्वत्र पळापळ सुरू झाली. यात दोन नागरिकांचा जागीच मृत्यू झाला, तर काही जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे.
तालिबान अजिबात बदललेला नाही बायडन
“तालिबान अजिबात बदललेला नाही. तालिबानसह इतर दहशतावादी संघटनांचा जगाला धोका आहे. सध्या तालिबान अस्तित्वाची लढाई लढत आहे. जगातील बदलांमुळे अफगाणिस्तानच्या तुलनेत ‘अल कायदा’ आणि त्यांच्या सहकारी संघटनांचा धोका जगातील इतर भागांना अधिक आहे,”