विषाणूची रचना - भाग ८

    16-Aug-2021
Total Views | 44
virus_1  H x W:



विषाणूच्या रचनेचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला असे लक्षात आले की, जर या विषाणूला माणसाच्या शरीरातून कायमचे हद्दपार करायचे असेल, तर त्या विषाणूसाठी जे औषध निर्माण करायचे, ते त्या विशिष्ट माणसाच्या प्रकृतीनुसारच असायला हवे. कारण, त्या माणसाची जनुकीय प्रकृती हीच त्या विषाणूचीही जनुकीय प्रकृती झालेली असते आणि म्हणूनच होमियोपॅथीमध्ये या वैयक्तिकीकरणाला (Individualisation) अनन्यसाधारण महत्त्व आहे.
 
 
डॉ. स्टुअर्ट क्लोज आपल्या ‘जिनियस ऑफ होमियोपॅथी’ या पुस्तकात असे लिहितात की, “पूर्वीपासून जी लसीकरण मोहीम विषाणू आणि जीवाणू यांच्या विरोधात राबवली गेली, त्यानंतर हे विषाणू किंवा जीवाणू पृथ्वीवरून नष्ट झाले नाहीत, तर गेल्या काही वर्षांचा आलेख पाहता, जवळजवळ सर्वच विषाणू व जीवाणू अजूनही मानवजातीला त्रास देतच आहेत.” उदाहरणच घ्यायचे झाले, तर सर्वात मोठे उदाहरण घेऊया, क्षयरोगाचे! देशातील प्रत्येक बाळाला जन्माला आल्यानंतर लगेच ‘बीसीजी’ची लस दिली, तरीही देशात सर्वात मोठा आजार जर कुठला असेल, तर तो ‘टीबी’ म्हणजेच ‘क्षयरोग’ होय.
  
दुसरे उदाहरण आपण लहान मुलांना बालरोगतज्ज्ञांकडे घेऊन गेलो, तर त्यांच्याकडून असे सांगण्यात येते की, लहान मुलांना ‘इन्फ्ल्युएन्झा’ची लस द्यावीच लागेल व असे करून त्यांना ती लस दिली जाते. परंतु, असे लक्षात आले आहे की, या लसी दिल्यानंतरही जगातून ‘इन्फ्लुएन्झा’ काही गेलेला नाही. उलट मोठ्या प्रमाणावर त्याच्या केसेस पाहायला मिळतात. याचाच अर्थ काय तर लसीकरण हे काही विषाणूंना रोखू शकत नाही. कारण, डॉ. स्टुअर्ट क्लोज म्हणतात की, “या लसीकरणाला मानवी प्रतिकारशक्तीवर अनुकूल परिणाम न होता प्रतिकूल परिणाम होतो. हा प्रतिकूल परिणाम शरीरावर लगेच दिसून येत नाही. पण, कालांतराने आपल्याला शरीरातील व मनातील बदल जाणवायला लागतात. वेगवेगळ्या प्रकारचे नवीन आजार समाजामध्ये दिसून येतात.” याचे अजून एक उदाहरण पाहूया.
 
साधारणपणे २०-२५ वर्षांपूर्वी कर्करोगाचे रुग्ण आपण पाहत असू, पण ते फार कमी प्रमाणात होते. परंतु, आता गेल्या काही वर्षांत जर आपण या विविध प्रकारच्या कर्करोगाचा आलेख पाहिला तर आपल्याला असे लक्षात येईल की, कर्करोगाचे रुग्ण झपाट्याने वाढले आहेत. हे का होते? हे कशामुळे होते? जर विविध औषधे, विविध लसी सर्वत्र उपलब्ध आहेत, तर मग रोगराई जात का नाही? का आता कर्करोग, मानसिक आजार, मेंदूशी संबंधित आजार वाढू लागले आहेत? याचा विचार व्हायला हवा. लसीकरणाचे होणारे दुष्परिणाम हे डोळ्याने दिसत नाहीत, पण कालांतराने मात्र अनुभवाला येतात, असे यातून दिसते. होमियोपॅथी म्हणूनच यापेक्षा वेगळी व प्रभावी ठरते, जी प्रत्येक माणसाचा खोलवर विचार करून त्या माणसाच्या प्रकृतीला अनुसरूनच औषध देते. त्यामुळे रोग मुळापासून निघून जातो. वैद्यकीय उपचारांच्या या धुमाळीत म्हणूनच पुढे होमियोपॅथीला पर्याय नाही. कारण, येणार्‍या भविष्यकाळात होमियोपॅथीची औषधे मानवजातीला वाचवू शकतील.
 

डाॅ. मंदार पाटकर
(लेखक एम.डी. होमियोपॅथी आहेत.)
9869062276
अग्रलेख
जरुर वाचा
अटल सेतु सह अन्य टोल नाक्यावर इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

अटल सेतु सह अन्य टोल नाक्यावर इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

राज्यातील इलेक्ट्रिक वाहन उद्योगाला व वाहनधारकांना चालना देण्यासाठी टोल नाक्यावर टोलमाफी देण्याची धोरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य शासनाने घेतले होते. त्यानुसार २१ ऑगस्टपासून अटल सेतू सह मुंबई -पुणे द्रुतगती महामार्ग तसेच समृद्धी महामार्गावरील सर्व टोल नाक्यांवर इलेक्ट्रिक वाहनांना टोल माफी करण्यात येत असल्याची अधिसूचना राज्य सरकारने जारी केली आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121