ट्विटरचा टिवटिवाट आणि बदलती बातमीदारी...

    14-Aug-2021
Total Views | 182
twiter 1_1  H x

२००६ साली मुख्यत्वे अमेरिकेत सुरु झालेल्या ट्विटरने अल्पावधीत जगभरात आपले हातपाय पसरवले. आज याच ट्विटरचे भारतात २२ दशलक्षाहून अधिक सक्रिय वापरकर्ते आहेत. तेव्हा, या बदलत्या माध्यमजगतात ट्विटरची भूमिका आणि त्यानिमित्ताने वृत्तसंकलनाचे बदललेले आयाम यांचा या लेखात आढावा घेण्याचा केलेला हा प्रयत्न...


भारत हे जगातील मोठ्या लोकशाही राष्ट्रांपैकी एक राष्ट्र. स्वातंत्र्यापश्चात भारतीय नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे योग्यरित्या जतन आणि संवर्धन होईल, या अनुषंगाने भारतीय संविधानात ‘फ्रीडम ऑफ स्पीच’ अर्थात ‘अभिव्यक्तिस्वातंत्र्य’ अबाधित राखण्यासाठी अनेक तरतुदी करण्यात आल्या. तसेच त्याची गळचेपी होत असेल, तर त्या विरुद्ध कारवाईचा बडगा उगारण्याचा अधिकारही याच संविधानाने नागरिकांना बहाल केला. तसे पाहिले तर देशाच्या जडणघडणीमध्ये लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या प्रसारमाध्यमांनी अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका निभावलेली आहे. मात्र, मागील काही वर्षांपासून ‘इलेक्ट्रॉनिक मीडिया’सोबतच ‘सोशल मीडिया’ देशात अगदी वायुवेगाने पसरला. २०१४ साली देशात झालेल्या मोठ्या राजकीय परिवर्तनातही या समाजमाध्यमांनी मोलाची भूमिका निभावली. जनसामान्यांचा आक्रोशही याच समाजमाध्यमांवरुन त्यावेळी मोठ्या संख्येने समोर आला. त्यामुळे मुख्य प्रवाहातील प्रसारमाध्यमांनीही समाजमाध्यमाच्या अस्त्राचा आपल्या माध्यम समूहाला मोठे बनविण्यासाठी खुबीने वापर करून घेतला आणि यापुढेही तो असाच सुरु राहील. उलटपक्षी प्रसारमाध्यमांनी वापरलेले ‘सोशल मीडिया’ नावाचे हे हत्यार आता मुख्य प्रवाहातील माध्यमांसाठी तितकेच डोकेदुखीचे तर ठरले नाही, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो.
ट्विटर आणि मोदींची प्रचारनीती

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या डिजिटल प्रचारतंत्र आणि सोशल मीडियावरील सक्रियतेसाठी संपूर्ण विश्वात ओळखले जातात. २०१४ साली देशात तत्कालीन संपुआ सरकारविरोधात असलेला असंतोष आणि सरकारवरील अविश्वासाला मतपेटीच्या माध्यमातून बदलून देशाला नवीन सरकार देण्यासाठी मोदींनी प्रचारतंत्रामध्ये ‘सोशल मीडिया’चा मोठ्या प्रमाणात वापर करण्याची सुरुवात केली. प्रचारतंत्रातील पारंपरिक यंत्रणा आणि साधनसामग्रीला बाजूला सारत मोदींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचाराची एक नवी प्रणाली देशामध्ये रुढ केली. केवळ प्रचारच नाही, तर देशपातळीवरील अनेक शासकीय निर्णयही पंतप्रधान मोदींनी ट्विटर, फेसबुकसारख्या समाजमाध्यमांतून माध्यमे आणि देशवासीयांपर्यंत प्रसारित केले. त्यामुळे आता ट्विटर आणि निवडणूक प्रचार हे नवे समीकरण देशात नव्याने रुढ झालेले दिसते. असेच काहीसे महासत्ता असलेल्या अमेरिकेतही घडले होते. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही आपल्या प्रचारात सोशल मीडियाचाही पुरेपूर वापर करुन घेतला होता.

माध्यमांचे ट्विटरकेंद्रित राजकारण
भारतात फेसबुक, ट्विटर या समाजमाध्यमांचा २०१०-२०११ पर्यंत वापर अगदी मर्यादित स्वरूपात होता. मात्र, दिल्ली येथे घडलेल्या ‘निर्भया बलात्कार’ प्रकरणाला दिल्लीच्या बाहेर काढून संपूर्ण देशभरात वणव्यासारखे सर्वदूर पसरवण्यात समाजमाध्यमांनी मोठा हातभार लावला. एका मागून एक घडत गेलेल्या घटना आणि त्या जनतेसमोर आणण्यात झालेला सोशल मी{डयाचा यशस्वी वापर, हे या नवमाध्यमाच्या देशभरात झालेल्या प्रचंड विस्ताराचे गमक आहे. हे विशद करण्यामागील कारण म्हणजे जसजसा फेसबुक, ट्विटरचा प्रभाव वाढत गेला, त्या प्रमाणात प्रसारमाध्यमांनीही आपल्या भूमिका ट्विटरवरील चाहत्यांना अनुसरुन किंवा बदलत्या वातावरणानुसार घ्यायला सुरुवात केली. कुठलीही महत्त्वाची बातमी जर ‘ब्रेक’ करायची असेल, तर त्यासाठी पूर्वी प्रेसनोट किंवा काही वृत्तपत्रे सायंदैनिक प्रसिद्ध करायची. मात्र, आता अशी कुठलीही बातमी ‘ब्रेक’ करायची असेल, तर सर्वप्रथम आपापल्या संकेतस्थळांबरोबरच समाजमाध्यमांचाही तितकाच सक्रियपणे वापर केला जातो. त्यामुळे आपोआपच ट्विटरला केवळ भारतातच नव्हे, तर अगदी जगभरात अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेले दिसते.
ट्विटर - एक आधुनिक वृत्तसंस्था

 
एकाचवेळी लक्षावधी लोकांशी संपर्क साधता येणे ही ट्विटर, फेसबुकसारख्या समाजमाध्यमांची खरी जमेची बाजू. संवाद साधण्यासाठीच्या अशा मोठ्या व्यासपीठामुळे अनेक सरकारी निर्णयांच्या घोषणा, काही महत्त्वपूर्ण घडामोडींचे ताजे अपडेट्स किंवा राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर घडणार्‍या अगदी बारीकसारीक घटना आता ट्विटरच्या माध्यमातून नेटिझन्सपर्यंत क्षणार्धात पोहोचतात. गुजरातच्या तत्कालीन मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनीही आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सोशल मीडियाच्या व्यासपीठावरुन दिल्याची घटना आपल्या लक्षात असेल. तसेच देशात २०१४ साली सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने देशात अनेक{वध कार्यक्रम डिजिटल माध्यमातून राबविण्यास सुरुवात केली आणि ‘डिजिटल इंडिया’ला सर्वार्थाने बळकटी दिली. त्यातील एक महत्त्वपूर्ण उपक्रम केंद्रीय रेल्वे मंत्रालयाच्यावतीने तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या कल्पनेने राबविण्यात आला होता. त्याची संकल्पना अशी होती की, भारतीय रेल्वेतून प्रवास करताना जर प्रवाशांना कुठलीही अडचण आली, तर फक्त रेल्वे मंत्रालयाला उद्देशून एक ट्विट केल्यानंतर संबंधित प्रवाशांना काही मिनिटांत त्या अडचणीपासून सुटका करण्याचा रेल्वेचा प्रयत्न होता आणि अपेक्षेप्रमाणे रेल्वे मंत्रालयाच्या संकल्पनेचा मोठा सकारात्मक परिणाम पुढील काळात सर्वसामान्यांचा रेल्वेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याच्या माध्यमातून दिसून आला.
 
आणखी एका मंत्रालयाने ट्विटरच्या सदुपयोगातून जगाच्या पाठीवर कुठेही वसलेल्या भारतीयाला भारताशी जोडले ते मंत्रालय म्हणजे विदेश मंत्रालय. विदेश मंत्रालयाच्या तत्कालीन मंत्री सुषमा स्वराज यांनी ट्विटरच्या माध्यमातून विदेशात कुठेही अडचणीत आलेल्या भारतीयाला आहे, त्या ठिकाणी मदत पोहोचविण्याचे काम अत्यंत चोखपणे बजावले. पाकिस्तान, बांगलादेश या भारताच्या शेजारी राष्ट्रांमधील काही भारतीयांना तत्काळ मदत पोहोचविण्याचे एरवी किचकट, गुंतागुंतीचे वाटणारे काम सुषमा स्वराज यांनी ट्विटरच्या माध्यमातून अगदी सुलभ केले. दुसरी बाब म्हणजे काही कलाकार, ज्येष्ठ उद्योगपती उदा. सोनू सुद, आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवरील एका आवाहनावर अनेक गरजूंना आवश्यक ती मदत पुरविण्यासाठीही सदुपयोग केला. नुकताच आनंद महिंद्रा यांनी ऑलिम्पिकच्या यशाचा सुवर्ण मानकरी ठरलेल्या नीरज च्रोपाला त्याच्या विजयाबद्दल एसयूव्ही गाडी भेट म्हणून देण्याची घोषणाही ट्विटरवरुन केली आणि त्याची क्षणार्धात बातमीही झाली. त्यामुळे अशी हजारो उदाहरणे देता येतील, जी ही सिद्ध करतात की, {ट्वटरला आता जागतिक वृत्तसंस्थेसारखे स्वरुपच जणू प्राप्त झाले आहे.
ट्विटरवरील वाक्युद्ध

वरील परिच्छेदात नमूद केल्याप्रमाणे जसा ट्विटरचा प्रभाव आ{ण प्रसार वेगाने होऊ लागला, त्याचप्रमाणात समाजातील विविध पातळीवरील, विविध विचारसरणीचे आणि विविध सामाजिक, राजकीय मतप्रवाहातील मंडळींचा ट्विटरवर वावरही वाढला. दिवसागणिक ट्विट्स आणि ‘फॉलोअर्स’ ही आकडेवारीदेखील वाढत गेली आणि त्यातूनच वादाच्या मुद्द्यांनाही तोंड फुटत गेले. याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या अनेक वादग्रस्त ट्विट्समुळे अखेर ट्विटरने ट्रम्प यांचे खाते कायमचे गोठवले. कोरोना संसर्गाच्या प्रसारावरून चीनवर केलेली टीका, कोरोनामुळे अमेरिकेत झालेले मृत्यू, जागतिक तापमानवाढीवरून पुन्हा एकदा चीनवर साधलेला निशाणा, राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीवेळी झालेले वाद आणि प्रतिस्पर्धी जो बायडन यांच्यावर केलेली टीका असो, अशा एक ना अनेक कारणांमुळे ट्विटरनेही राजकीय मुखवटे परिधान करुन वादालाच आमंत्रित केले. भारतातही अनेक राजकीय मंडळी-पत्रकार-कलाकार हे कायम आपल्या ट्विट्समुळे वादाच्या भोवर्‍यात अडकले. ताजं उदाहरण म्हणजे अभिनेत्री कंगणा राणावतने महाराष्ट्र सरकारविरोधात मोर्चा उघडला होता. ट्विट आणि व्हिडिओज्च्या माध्यमातून कंगनाने सरकारसोबतच बॉलिवूडलाही हादरे द्यायला सुरुवात केली. त्या दरम्यानच केलेल्या एका ट्विटमुळे कंगनाला आपल्या ट्विटर अकाऊंटवर बंदीची कारवाई ओढवून घ्यावी लागली होती.
ट्विटर पत्रकारितेचा उदय
 
ट्विटरच्या माध्यमातून देशातील जनता अत्यंत सहजसोप्या पद्धतीने जगाशी जोडली गेली, हे कबूल करावेच लागेल. कुठल्याही घटनेची माहिती घटना घडल्यानंतर अवघ्या काही क्षणात उपलब्ध करून देण्याची ‘ब्रेकिंग न्यूज’ची संकल्पना
खर्‍या अर्थाने याच समाजमाध्यमांनी नव्या अर्थाने जगासमोर आणली. दररोज वृत्तपत्र आणि टीव्हीवरील बातम्यांच्या आहारी गेलेली जनता हळूहळू या माध्यमांकडे मनोरंजनासाठीच नव्हे, तर बातम्यांसाठीही वळू लागली.
 
जगभरात गेल्या काही वर्षांत सोशल मीडियाने मुख्य प्रवाहातील माध्यमांची मोठी जागा व्यापून वृत्तवाहिन्या, वृत्तपत्रे आणि इतर प्रस्थापित माध्यमांना मागे टाकत आपली एक स्वतंत्र ओळख, हक्काची जागा निर्माण केली आहे. त्याचे फायदे {कती अन् तोटे किती, हा जरी वादाचा आणि चर्चेचा मुद्दा असला तरी आज हे वास्तव नाकारता येणार नाही. घडणारी प्रत्येक घडामोड, मग ती जगातील असो वा देशांतर्गत, ती सर्वप्रथम समाजमाध्यमांद्वारे हल्ली जगापुढे येते. त्यामुळे या माध्यमांनी आपली स्वतंत्र ‘स्पेस’ निर्माण केलेली दिसते. मात्र, जो विश्वास किंवा जी खात्री आपण मुख्य प्रवाहातील माध्यमांमधील बातम्यांवर दाखवू शकत होतो किंवा काही अंशी आजही दाखवत आहोत, तशी विश्वासार्हता कमवण्यात ट्विटर यशस्वी ठरले आहे का, हा प्रश्न मुळात अनुत्तरित आहेच. मुळात ट्विटरवर आलेल्या बातमीची विश्वासार्हता काय? त्या बातमीत कितपत सत्यता आहे? या सर्व बाबी ‘{ट्वटर’ या संस्थेच्याच एकंदर कामकाजावर आणि प्रणालीवर भलंमोठं प्रश्नचिन्ह उभं करतात. वृत्तपत्रीय पत्रकारितेवर आजही सर्व स्तरातील लोकांचा विश्वास आहे. स्पर्धेच्या युगात आ{ण अतिवेगाच्या आहारी जात असताना, {ट्वटरसारखी माध्यमे लोकांना आकर्षित करण्यासाठी भडंगपणा आणि भपकेबाजपणा भलेही दाखवण्यात यशस्वी ठरली असतील. मात्र, {ट्वटरवर कोणीही टाकलेली कुठलीही माहिती, कुठल्याही बातम्या यांची सत्यता पटविणे, हे तितकीच कर्मकठीण. दिग्गजांच्या निधनांच्या उडणार्‍या अफवा हे त्याचेच एक ज्वलंत उदाहरण.

ट्विटरचा आडमुठेपणा आणि अरेरावी

 
अवघ्या काही वर्षांच्या कालावधीत ट्विटरसारख्या समाजमाध्यमाला मिळालेली यशस्विता आणि झालेला अमर्याद विस्तार, हे जरी डोळे दीपवणारे असले तरी त्या मागून काही अनावश्यक बाबीही ट्विटरला चिकटल्या आहेत. अमर्याद विस्तार आणि लोकांनी या माध्यमाचा केलेला स्वीकार यातून अशा समाजमाध्यमाने केलेली अरेरावी आणि लोकांच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर गदा आणण्याची जणू मोहीमच सुरु केली होती. काही महिन्यांपूर्वी काही निवडक पण जाचक अटी ट्विटर-व्हॉट्सअ‍ॅपसारख्या माध्यमांनी लोकांवर लादण्याचा प्रयत्न केला. केंद्र सरकारने हस्तक्षेप करूनही ही समाजमाध्यमे आपल्या हटवादी आणि मग्रूर वृत्तीपासून तसूभरही मागे हटायला तयार नव्हती. अखेर सरकारचा दबाव आणि आपल्या अभिव्यक्तीवर गदा येण्याच्या भीतीने संतप्त झालेल्या भारतीयांच्या रेट्यापुढे ट्विटरला शरणागती पत्करणे भाग पडले आणि अवघ्या काही आठवड्यांपूर्वी ट्विटर आणि व्हॉट्सअ‍ॅप या माध्यमांनी आपल्या जाचक पॉलिसी मागे घेतल्या आणि ट्विटरची मक्तेदारी मोडून काढली.
{कमान ज्ञानाची आवश्यकता
 
 
अशा प्रकारच्या माध्यमांचा वापर करताना, राजकीय मंडळींसोबतच सामान्य जनतेनेही काही मूलभूत गोष्टींचे ज्ञान बाळगणे अत्यावश्यक आहे.आपण व्यक्त होत आहोत ते व्यासपीठ, आपली सुरक्षितता आणि इतर आवश्यक गोष्टींचा सांगोपांग विचार करुनच समाजमाध्यमांवर व्यक्त होणे, हे शहाणपणाचे ठरणार आहे. नुकताच राज्यातील एका नेत्याने क्रांतिदिनी क्रांतिकारकांना अभिवादन करताना आपला पुरेसा अज्ञानीपणा सिद्ध करत काही आक्षेपार्ह गोष्टी प्रसारित केल्या होत्या, ज्यावरुन मोठा गहजब राज्यात उडाला होता. सार हेच की, अशा प्रकारची माध्यमे वापरताना आपण आपली गोपनीयता आणि सुरक्षितता या गोष्टींकडेच मुख्यत्वे लक्ष दिले पाहिजे, हे मात्र नक्की!
- ओम देशमुख





 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121