डोंबिवलीतील विष्णुनगर पोलिस ठाण्याच्या जागेत उभी राहणार सुसज्ज अभ्यासिका

    22-Jun-2021
Total Views | 119
 
 
 
  
 library photo_1 &nbs
 
डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील स्टेशनजवळ असलेल्या जुने विष्णुनगर पोलिस ठाणे स्थलांतरित करण्यात आले आहे. त्यामुळे जुन्या पोलिस ठाण्याची जागा गेल्या चार वर्षापासून पडून होती. या जागेत आता सुसज्ज अभ्यासिका उभारण्याच्या कामाला सुरूवात करण्यात आली आहे.


डोंबिवली पश्चिमेत ग्रंथसंग्रहालयासाठी प्रशस्त इमारत असावी म्हणून पालिकेच्या प्रशासकीय राजवटीत माजी नगराध्यक्ष आबासाहेब पटवारी यांच्या प्रयत्नातून पश्चिम रेल्वे स्थानकाजवळ संग्रहालयासाठी असलेल्या राखीव भूखंडावर दोन माळ्य़ांची प्रशस्त इमारत बांधण्यात आली. डोंबिवली पश्चिमेतील स्टेशनजवळ असलेले जुने पोलिस ठाणे आनंदनगर ठाकूरवाडी येथील सुसज्ज इमारतीत चार वर्षांपूर्वीच स्थलांतरित करण्यात आले आहे. या जुन्या इमारतीच्या जागेत सुसज्ज अभ्यासिका सुरू करण्यात यावी अशी मागणी दिपेश म्हात्रे यांच्याकडून करण्यात आली होती. आनंदनगर ठाकूरवाडी येथील सर्व समावेश आरक्षणांतर्गत वाचनालय आणि अभ्यासिकेसाठी जागा आरक्षित होती. त्या जागेत अभ्यासिकाच सुरू करण्यात यावी अशी मागणी 2016 पासूनची होती. मात्र तत्कालीन पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांनी महापालिकेच्या माध्यमातून त्या जागेत पोलिस ठाणे स्थलांतरित केले. ही जागा महापालिकेने विष्णुनगर पोलिस ठाण्याला दिली. पोलिस ठाण्याला जागा दिल्याने अभ्यासिकेचा विषय बारगळला होता. त्यावेळी अभ्यासिकेच्या विकासासाठी महापालिकेने 25 लाख रूपयांचा निधी मंजूर केला होता. मात्र जुने विष्णुनगर पोलिस ठाणे अभ्यासिकेच्या जागेत स्थलांतरित झाले. आता पोलिस ठाण्याला नवी वास्तू मिळाली आहे. जुन्या पोलिस ठाण्याच्या जागेत दुस:या मजल्यावर डोंबिवली ग्रंथ संग्रहालय आहे. हे सगळ्य़ात जुने ग्रंथ संग्रहालय आहे. पोलिस ठाण्याच्या पहिल्या मजल्यावर अडीच हजार चौरस फूटाची जागा आहे. पोलिस ठाण्यामुळे अभ्यासिकेची जागा हुकल्याने पहिल्या मजल्यावरील जागेत अभ्यासिका सुरू करण्यासाठी मागणी केली जात होती. या मागणीला महापालिका प्रशासनाकडून सकारत्मक प्रतिसाद देण्यात आला असून त्यांच्या कामाला सुरूवात देखील झाली आहे. त्यासाठी महापालिकेने 40 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
 

कशी असणार अभ्यासिका

या जागेत एकाच वेळी शंभर विद्यार्थी अभ्यासिकेचा लाभ घेऊ शकतील. त्याठिकाणी वातानुकुलित व्यवस्था असेल. ई लायब्ररीचा सोय असेल. अभ्यासिका स्टेशन परिसरात असल्याने बाहेरील वाहनांचा आणि रहदारीचा आवाजाने विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये. यासाठी अभ्यासिका साऊंड प्रफु असणार आहे. विद्यार्थ्यांच्या जेवणासाठी एक वेगळी व्यवस्था असणार आहे.
 
 
 
------------------------------------------------------------
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
मुंब्रा रेल्वे दुर्घटनेबद्दल मुंबई उच्च न्यायालयाचे रेल्वे विभागाला खडेबोल! विचारले... या घटनेची जबाबदारी कुणाची?

मुंब्रा रेल्वे दुर्घटनेबद्दल मुंबई उच्च न्यायालयाचे रेल्वे विभागाला खडेबोल! विचारले... या घटनेची जबाबदारी कुणाची?

मुंब्रा लोकल स्थानकाजवळ ९ जून रोजी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास दुर्घटना घडली होती. दोन लोकल गाड्या एकमेकांजवळून जाताना लोकलच्या दारात लटकलेल्या प्रवाश्यांच्या बॅगा घासल्यामुळे ६ प्रवाशांचा रेल्वे रुळावर पडून मृत्यू झाला होता. या घटनेवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरूवार दि. १९ जून रोजी प्रवाशांच्या मृत्यूंबाबत एका जनहित याचिकेवर सुनावणी करत असताना चिंता व्यक्त केली आणि मध्य रेल्वेने मुंबई लोकल गाड्यांमध्ये स्वयंचलित बंद दरवाजे बसवण्याचा विचार करावा, असा सल्ला दिला...

क्रेडाई एमसीएचआय युथतर्फे नवी मुंबईसाठी पुनर्विकास प्रदर्शनाचे आयोजन

क्रेडाई एमसीएचआय युथतर्फे नवी मुंबईसाठी पुनर्विकास प्रदर्शनाचे आयोजन

नवी मुंबई आणि रायगड भागातील गृहनिर्माण क्षेत्रात परिवर्तन घडवून आणण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या पहिल्याच उपक्रमात चाळीस वर्षांखालील तरुण रिअल इस्टेट डेव्हलपर्सची संघटना, क्रेडाई एमसीएचआय युथतर्फे सिडको Exhibition सेंटर रविवार, २९ जून २०२५ रोजी सकाळी 10:00 ते संध्याकाळी 8:00 वाजेपर्यंत मेगा पुनर्विकास प्रदर्शन योजले आहे. आज नवी मुंबईतील हॉटेल ताज विवांता येथे रिअल इस्टेट उद्योगातील वरिष्ठ नेते, क्रेडाई एमसीएचआय युथचे पदाधिकारी आणि माध्यमांच्या उपस्थितीत आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121