बीजींग : चीन मधील २०२०च्या सर्वेक्षणानूसार चीनमध्ये ३ करोड पुरुष हे अविवाहित आहेत.चीनमध्ये जन्म दाराचे प्रमाण १११.७ मुलांमागे १०० मुली एवढे असल्याकारणाने ही परिस्थती उद्भवली आहे. याचमुळे चीनने काही वर्षांपासून फक्त एक मूल घरोघरी अशी मोहीम चालवली आहे. चीनमधील प्रत्येक पालकाला आपला पाल्य मुलगा असावा अशी इच्छा असते आणि याच असमानतेमुळे आता ही परिस्थिती उद्भवली आहे.
चीनमध्ये मागील वर्षी एकूण १ करोड २० लाख मुले जन्मली होती त्यात प्रत्येकी १११ मुलामागे फक्त १०० मुली आहेत. याबाबत तज्ज्ञ असा अंदाज वर्तवत आहेत की यांपैकी ६०००० मुले अविवाहित राहतील याचे कारण स्त्रियांचे प्रमाण कमी असणे. जगातल्या सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या आणि विकसित असलेल्या देशात ही बाब असणे हे चिंताजनक आहे. या असमानतेवर नियंत्रण आणण्यासाठी चीन एक मूल मोहीम राबवत आहे परंतु चीनला खऱ्या अर्थाने मुलींचा जन्म दर वाढविण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. तसेच त्यासाठी शिक्षण वैज्ञानिक करायला हवे असेहि चीनमधील तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे स्त्री जन्म दार हि खऱ्या अर्थाने चिंतेची बाब असून अविवाहित मुलांची समस्या वाढत आहे