नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर सहा-आठ आठवडे ते १२ ते १६ आठवड्यापर्यंत वाढवण्यात आले आहेत. एक निवेदनानुसार, 'डॉ. एन. एन. के. अरोरा' यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या कोविड वर्किंग ग्रुपने 'कोविशिल्ड' लसीच्या पहिल्या आणि दुसर्या डोसमधील अंतर वाढवण्याची शिफारस केली आहे. कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर सध्याचे अंतर सहा ते आठ आठवडे आहेत.
मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, सध्या उपलब्ध पुराव्यांनुसार, ब्रिटनमध्ये कोरोनावर संशोधन करत असणाऱ्या एका गटाने दोन डोसमधील अंतर १२ ते १६ आठवड्यांचे करण्यास मान्यता दिली आहे. मात्र, 'कोवॅक्सिन'च्या डोसबद्दल अत्याप कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. कोविशिल्डच्या डोसबद्दल सुचवण्यात आलेले बदल हे एनईजीव्हीएसी या निती आयोगाच्या अध्यक्षांच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या संस्थेने मान्य केले आहेत. नीती आयोगाचे आरोग्य विभागाचे अध्यक्ष डॉ. वी.के. पॉल यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या बैठकीत ही माहिती देण्यात आली. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोविशिल्डच्या दोन लसींच्या अंतराबद्दल सुचवण्यात आलेले हे बदल स्वीकारले आहेत.