ग्रेटा थनबर्ग विरोधात नाही; ‘टूलकिट’विरोधात गुन्हा!

    05-Feb-2021
Total Views | 97
greta thunburg_1 &nb
 
 
 

द्वेष पसरवल्याचे आणि गुन्हेगारी कट रचल्याचे आरोप

 
 
नवी दिल्ली: द्वेष पसरविणे आणि गुन्हेगारी कट रचणे या आरोपांखाली ‘टूलकिट’विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे दिल्ली पोलिसांनी गुरुवार, दि. ४ फेब्रुवारी रोजी स्पष्ट केले. दिल्ली पोलिसांनी भारतीय दंड संविधान नुसार ‘कलम १५२ अ’ आणि ‘१२० ब’अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. कृषी सुधारणा कायद्याविरोधात सुरू असलेल्या शेतकर्‍यांच्या आंदोलनासंदर्भात चिथावणीखोर ट्विट केल्याचा ठपका ठेवत दिल्ली पोलिसांनी स्वीडनची रहिवासी आणि कथित पर्यावरणप्रेमी ग्रेटा थनबर्न विरोधात गुन्हा दाखल केल्याचे वृत्त होते.
 
 
 
मात्र, द्वेष पसरवण्याचा प्रयत्न तसेच गुन्हेगारीचा कटाचा आरोप करण्यात आल्यानंतर 'टूलकिट’विरोधात भादंविनुसार ‘कलम १५३ अ’ तसेच ‘१२० ब’नुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ ग्रेटाकडून करण्यात आलेल्या ट्विटमधून केंद्र सरकारवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. धक्कादायक म्हणजे, ग्रेटाने एका ट्विटद्वारे भारतातील आंदोलनाला कशाप्रकारे चिथावणी द्यायची, त्यासाठी कोणकोणते उपक्रम राबवायचे आणि कोणत्या व्यक्तींची मदत घ्यायची, यांची इत्यंभूत माहिती असलेले एक ‘टूलकिट’ही सार्वजनिक केले होते. मात्र, त्यामुळे आपला बुरखा फाटल्याचे लक्षात येताच ते ट्विट डिलीट करण्यात आले होते.
 
 
 
 
दरम्यान, विषयाची माहिती न घेताच कोणत्याही विषयावर टिप्पणी करू नका, असे परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले होते. त्यानंतर सचिन तेंडुलकर, अनिल कुंबळे, रोहित शर्मा, सुरेश रैना, विराट कोहली, सायना नेहवाल या जगप्रसिद्ध खेळाडूंनीही भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये परदेशी व्यक्तींनी हस्तक्षेप करू नये, असे सांगणारे ट्विट केले होते. त्यामुळे देशातील एका विशिष्ट वर्गाला संताप अनावर झाल्याचेही दिसून आले आहे.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
शाळा आणि रुग्णालयाच्या बांधकामापूर्वीच ठेकेदाराला वाटले दीड कोटी

शाळा आणि रुग्णालयाच्या बांधकामापूर्वीच ठेकेदाराला वाटले दीड कोटी

बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांचा प्रताप; विधान परिषदेत पडसाद, निलंबनाची कारवाई छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शाळा आणि रुग्णालयाच्या बांधकामापूर्वीच ठेकेदाराला दीड कोटी वाटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विधान परिषदेत त्याचे पडसाद उमटले असून, प्राथमिक चौकशीअंती दोषी आढळलेल्या शाखा अभियंता आणि कार्यकारी अभियंत्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. येत्या दोन महिन्यांत खातेनिहाय चौकशी पूर्ण करून तथ्यांनुसार पुढील कारवाई करण्याचे आश्वासन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सोमवार, दि. ७ जुलै रोजी दिले...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121