उत्तराधिकारीसंदर्भात कोणताही निर्णय घेतला नाही : दलाई लामा

    06-Jul-2025   
Total Views |

हिमाचल प्रदेश: मॅकलिओडगंज येथील त्सुगलाखांग मंदिरात दलाई लामा यांच्या ९० व्या वाढदिवसापूर्वी दीर्घायुष्य प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उत्तराधिकार्‍याबाबत उत्तर देताना ते म्हणाले की बोधिसत्व अवलोकितेश्वर यांचा आशीर्वाद आपल्यासोबत आहे. अनेक भाकितं आणि संकेतांच्या आधारे, मी १३० वर्षांपर्यंत जिवंत राहील, असा मला पूर्ण विश्वास आहे. आशा आहे की, आपण आणखी ३० ते ४० वर्ष जगू आणि लोकांची सेवा करत राहू. त्यामुळे उत्तराधिकार्‍याबदद्ल सध्या काहीही निर्णय घेतला नाही. या कार्यक्रमाला १५००० पेक्षा जास्त लोक उपस्थित होते



योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.