मुंबई : उद्धव ठाकरे हे सूर्याजी पिसाळ यांची औलाद आहे, असा हल्लाबोल भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. तसेच उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत अनैसर्गिक आघाडी केल्याचेही ते म्हणाले.
गोपीचंद पडळकर म्हणाले की, "उद्धव ठाकरे हे सूर्याजी पिसाळ यांची औलाद आहे. २०१९ ला महाराष्टातील जनतेने देवाभाऊंना मुख्यमंत्री होण्यासाठी बहुमत दिले होते. पण उद्धव ठाकरेंनी अनैसर्गिक आघाडी केली. महाराष्ट्रात कधी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना अशी आघाडी झाली होती का? त्यामुळे उद्धव ठाकरेंनी सूर्याजी पिसाळांचे काम केले आहे," असे ते म्हणाले.
२०१९ ला घात केला
"देवाभाऊ हे महाराष्ट्रातील गोरगरीब लोकांच्या गळ्यातील ताईत आहेत. महाराष्ट्रातील उपेक्षित, वंचित, पीडित, प्रतारित, अपमानित लोक, अठरापगड जातींचे, बारा बलुतेदार, भटके विमुक्त, ओबीसी शेतकरी, कष्टकरी, आदिवासी आणि मागासवर्गीयांचे देवभाऊ हे हृदयसम्राट आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे काय बोलले याला काडीचेही महत्त्व नाही. हे सूर्याजी पिसाळांची औलाद आहेत. २०१९ ला त्यांनी घात केला. महाराष्ट्रातील जनतेने भरघोस मतदान करून महायुतीचे २३७ आमदार निवडून दिलेत. देवाभाऊ पुन्हा महाराष्ट्रात सत्तेत आले आणि पुन्हा आषाढी एकादशीची पूजा पांडुरंगाच्या आशीर्वादाने पार पडली. उद्धव ठाकरेंकडचे सगळे आता निघून गेलेत. त्यांच्याकडे कुणीही येण्यासारखे नाही. उद्धव ठाकरेंची मानसिकता आता पूर्णपणे बिघडली आहे," अशी टीकाही गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....