अमेरिकेच्या राजकारणात तिसऱ्या पक्षाची एन्ट्री! एलॉन मस्क यांच्याकडून नव्या राजकीय पक्षाची घोषणा

    07-Jul-2025   
Total Views |

Elon Musk

वॉशिंग्टन : (Elon Musk announces forming of 'America Party') अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उद्योगपती एलॉन मस्क यांच्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून मतभेद सुरु आहेत. त्यांच्यातील वादाचं मूळ कारण म्हणजे नुकतंच अमेरिकेत मंजूर झालेले 'वन बिग ब्युटीफूल बिल' हे विधेयक. या विधेयकाला मस्क यांनी विरोध केला होता. हे विधेयक अंमलात आल्यास थेट अमेरिकेच्या राजकारणात उतरण्याचे संकेत मस्क यांनी दिले होते. याच पार्श्वूभूमीवर मस्क यांनी मोठा निर्णय घेत नव्या राजकीय पक्षाची घोषणा केली. त्यांच्या या नव्या पक्षाचे नाव 'अमेरिका पार्टी' असे आहे.
 

एलॉन मस्क यांनी शनिवारी त्यांच्या एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॅार्मवर यासंदर्भात पोस्ट करत माहिती दिली. या पोस्टमध्ये त्यांनी अमेरिकेत 'अमेरिका पार्टी' नावाचा नवीन राजकीय पक्ष स्थापन केल्याची घोषणी केली. एलॉन मस्क यांनी एक्सवर म्हटलं आहे की, "अमेरिका पार्टीची आज स्थापना होत आहे. या पार्टीची घोषणा तुम्हाला तुमचे स्वातंत्र्य परत देण्यासाठी झाली आहे", असे म्हटले आहे.


तसेच एका सर्वेक्षणाचा संदर्भ देत मस्क यांनी सांगितल की नवीन राजकीय पर्यायासाठी जवळपास १.२ दशलक्षाहून अधिक लोकांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच नव्या राजकीय पक्षाची घोषणा करताना मस्क यांनी सध्याच्या राजकीय व्यवस्थेवर टीका केली आहे. "जेव्हा कचरा आणि भ्रष्टाचाराने आपला देश दिवाळखोरीत काढण्याचा विचार येतो तेव्हा आपण लोकशाहीत नव्हे तर एकपक्षीय व्यवस्थेत राहतो, असेही म्हटले आहे.
 

एलॉन मस्क यांनी त्यांच्या पक्षाची घोषणा करताना म्हटले आहे की, सध्या ते फक्त सिनेटच्या २ ते ३ जागा आणि ८ ते १० हाऊस डिस्ट्रिक्टवरच लक्ष केंद्रीत करणार आहेत. यामुळे अमेरिकेतील रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक या दोन पक्षीय राजकीय व्यवस्थेला आव्हान मिळणार आहे. अमेरिकेतील जे लोक या दोन प्रमुख राजकीय पक्षांच्या (रिपब्लिकन-डेमोक्रॅटिक) बाबतीत समाधानी नाहीत, असे ८० टक्के मतदारांसाठी 'अमेरिका पार्टी' हा पर्याय असल्याचा मस्क यांचे म्हणणे आहे.


अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\