मुंबई : परळी येथील तरुणी पूजा चव्हाण हिच्या मृत्यूंनंतर राजकारण चांगलंच तापताना दिसतंय.पूजाच्या आत्महत्येप्रकरणी चौकशी व्हावी, असा पवित्रा विरोधी पक्षांनी घेतला आहे. तर दुसरीकडे मात्र पूजा चव्हाण हिचे कुटुंब नि:शब्द आहेत. माझ्या मुलीच्या आत्महत्येची चौकशी झाली पाहिजे, एवढीच मागणी पूजाचं कुटुंबीय करत आहेत. त्यानंतर आता भाजपच्या उपाध्यक्ष चित्र वाघ यांनी आक्रमक पवित्र घेत राज्याच्या गृहमंत्र्यांवर टीकास्त्र सोडले आहे.
चित्रा वाघ म्हणतात की, "गृहमंत्री जीं सध्या राज्यातील महिला अत्याचाराबाबत 'संजय”ची म्हणजेच जे जे दिसेल ते ते पहावे ते साथी सत्ताधाऱ्यांना कथन करत क्लीनचीट देत पुढे चालावेच्या भुमिकेत दिसताहेत. पूजा चव्हाण केसमध्ये मोबाईलच मोठा पुरावा आहे. संभाषण क्लीप्स मिळाल्या आहेत. ज्यात तिला आत्महत्येस परावृत्त करण्यापासून तर आत्महत्या झाल्यानंतर कसही करून तिचा मोबाईल ताब्यात घेण्यापर्यंतच्या सुचना कथित मंत्र्याकडून कुणा अरूणला होतांना सगळ्यांनी ऐकल्या आहे. अजूनही याबद्दल पोलिस काहीही स्पष्टता देत नाही. पूजा चव्हाणच्या परिवारावर दबाव असू शकेल पोलिस अशा केसेसमध्ये स्यु-मोटो दाखल करून घेऊ शकतात हे मी आपल्याला सांगायला नकोचं अर्थात त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती महत्वाची आहे. मुख्यमंत्री महोदय, एव्हढे पुरावे असतांना मुसक्या आवळायच्या सोडून कसली वाट पहाताय?" असा सवाल चित्र वाघ आईनी केला आहे.
काय आहे प्रकरण :
मूळची परळीची असलेली २२ वर्षाची पुजा चव्हाण पुण्यात शिकण्यासाठी आली होती. तिच्या भावासोबत ती पुण्यातल्या हडपसर भागात रहात होती. रविवारी मध्यरात्री १ च्या आसपास तिनं सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारली. हॉस्पिटलमध्ये नेत असतानाच तिचा जीव गेला. महमंदवाडी परिसरातल्या हेवन पार्कमध्ये ही घटना घडली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तिच्या आत्महत्येचा आणि विदर्भातल्या एका मंत्र्याचा संबंध असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली. प्रेमसंबंधातूनच पुजानं स्वत:ला संपवल्याचं बोललं जाऊ लागलं. पण पुजाच्या आत्महत्येनंतर कुठलीही चिठ्ठी किंवा इतर मेसेज असलेलं काही सापडलेलं नाही. पोलीसांनीही तशी काही माहिती दिलेली नाही. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. मात्र याप्रकरणातील एक ऑडिओ क्लिप सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे.
व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये मंत्र्याचा आवाज
पूजा चव्हाण आणि कथित मंत्री यांच्यातील संभाषणाचा एक ऑडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात एक तरुणी लवकर या असे बंजारा भाषेत कथित मंत्र्याला बोलावते. सोबतच तिसरी एक व्यक्तीला तरुणीच्या मनधरणीचा प्रयत्न कर म्हणून कथित मंत्री सांगत आहे. या प्रकरणात या ऑडिओ क्लिपचा फॉरेन्सिक अहवाल अद्याप बाहेर आलेला नाही. मात्र, त्यावूरन राज्यातील सरकारमधील एक मंत्री हा याच अडकू शकतो, अशी चर्चा सध्या आहे.