राहुल गांधींनी आजीच्या पापांची माफी मागावी!

    26-Jun-2025   
Total Views | 16

मुंबई : “महाराष्ट्रातील निवडणुकीविषयी अफवा पसरवणाऱ्या काँग्रेसने आधी आपला काळा इतिहास आठवून पहावा. राहुल गांधी यांनी त्यांच्या आजी इंदिरा गांधींनी आणीबाणी लादून जे पाप केले त्याबद्दल देशाची माफी मागावी,” असा घणाघात भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री खा. रवीशंकर प्रसाद यांनी बुधवारी केला.

स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात आयोजित '१९७५ आपातकाल : लोकतंत्र की हत्या' या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंत्री आशिष शेलार, आ. योगेश सागर, पराग अळवणी, अमित साटम, कालिदास कोळंबकर, भाई गिरकर, सुनील राणे, राजहंस सिंह, संजय उपाध्याय आणि भाजपचे मुंबईतील सर्व जिल्हाध्यक्ष उपस्थित होते.

प्रसाद म्हणाले, “१९७५ मध्ये केवळ खुर्ची वाचवण्यासाठी इंदिरा गांधी यांनी मंत्रिमंडळाची परवानगी न घेता देशावर आणीबाणी लादली. मी स्वतः त्या काळात जेपी आंदोलनात सहभागी होतो. तुरुंगात गेलो, लाठ्या खाल्ल्या. देशात भीतीचं वातावरण होतं. ६० लाख लोकांची जबरदस्तीने नसबंदी करण्यात आली, लोकांची नखं कापण्यात आली. २५३ पत्रकारांना अटक झाली, ५२ परदेशी पत्रकारांची मान्यता रद्द झाली, प्रेस कौन्सिल संपवली, आणि ११० जणांना मिसा कायद्यानुसार जेलमध्ये टाकण्यात आलं.”

माझा काँग्रेसला थेट सवाल आहे, आणीबाणीच्या काळातील अन्यायांसाठी तुम्ही आजवर माफी का मागितलेली नाही? राहुल गांधी लाल संविधान घेऊन फिरतात, पण त्यांचे पूर्वजच या संविधानाच्या हत्यारे होते. ‘संविधान खतरे में है’ म्हणणाऱ्यांनी आधी स्वतःच्या घराचा इतिहास पाहावा. आणीबाणीचा विषय निघाला की काँग्रेस नेते बेचैन का होतात?, असा सवालही रवीशंकर प्रसाद यांनी उपस्थित केला.

मोदींनी केले होते वेषांतर

“आणीबाणीच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक होते. तेव्हा सरदारजीच्या वेशात त्यांनी क्रांतीची ज्योत पेटवली. त्यांना पोलीस पकडण्यासाठी आले, मात्र वेषांतर केल्यामुळे ते सुटले", अशी आठवण रविशंकर प्रसाद यांनी सांगितली.

भाजप बदला घेईल - आशिष शेलार

- भाजपने देशभरात आयोजित केलेले आणीबाणीविरोधी कार्यक्रम म्हणजे नौटंकी असल्याची टीका उबाठा गटाचे खा. संजय राऊत यांनी केली. त्याला प्रत्युत्तर देताना भाजपचे मुंबई अध्यक्ष आणि कॅबिनेट मंत्री आशिष शेलार म्हणाले, "सकाळचा भोंगा म्हणतो की ही भाजपची नौटांकी आहे. पण संजय राऊत हे काँग्रेसचे मित्र, उबाठाचे प्रवक्ते आणि शरद पवारांचे हस्तक म्हणून बोलतात. आणीबाणीने भारतीय नागरिकांचे मूलभूत हक्क हिरावले, त्या आणीबाणीचे समर्थन म्हणजे स्वातंत्र्यसैनिकांचा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या संविधानाचा अपमान आहे. या अपमानाचा बदला भाजप घेईल, असे आशिष शेलार म्हणाले.

- पण त्याआधी संजय राऊत यांनी एक उत्तर द्यावे, लोकशाही टिकवण्याच्या या महायुद्धात शरद पवार काय करत होते? माझ्या संघाच्या विचारांचे किमान १ लाख स्वयंसेवकानी आपले तारुण्य अर्पण केले. तुम्ही कुठे होता?, असा सवाल त्यांनी केला. शेलार यांनी राहुल गांधींवर टीका करताना म्हटले की, "राहुल गांधी महाराष्ट्राच्या निवडणुकीबाबत कपोलकल्पित गोष्टी पसरवतात. पण ते विसरतात की भारतात निवडणूक मॅनेज करण्याचा पहिला खटला त्यांच्या आजी इंदिरा गांधी यांच्यावर चालला. त्यांनी सरकारी पैशांचा आणि अधिकाऱ्यांचा प्रचारासाठी वापर केला. त्यामुळे आमच्याकडे बोट दाखवण्याआधी काँग्रेसने स्वतःच्या कृतींकडे पाहावे", असा हल्लाबोल आशिष शेलार यांनी केला.

सुहास शेलार

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या आठ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. महाराष्ट्राचे राजकारण आणि त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. २०१४, २०१९ आणि २०२४ सालच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे वार्तांकन. २०१८ साली राजस्थानमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रत्यक्ष वार्तांकनाचा अनुभव.
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा
भाजपा महिला विभागाचे महिला बचत गटांना मार्गदर्शन :खानिवडे

भाजपा महिला विभागाचे महिला बचत गटांना मार्गदर्शन :खानिवडे

नायगांव पूर्व विभागातील जुचंद्र गावात (छत्रपती शिवाजी महाराज चौक) येथील भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा कार्यालयात जुचंद्र परिसरातील नव्याने तयार केलेल्या महिला बचत गटासाठी पहिल्यांदाच मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. वसई विधानसभा आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या मार्गदर्शनात तसेच जिल्हाध्यक्षा प्रज्ञाताई पाटील यांच्या नेतृत्वात महिला मोर्चाच्याहर्षलाप्रविण गावडे यांनी आयोजन केले होते. ह्या महिला बचत गटाच्या मार्गदर्शन शिबिराला वसई पूर्व दक्षिण मंडळाचे अध्यक्ष उदय शेट्टी, अल्पसंख्यांक महिला मोर्चाच्..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121