२४ तासांपूर्वीच बिपीन रावत यांनी दिला होता देशाला 'हा' इशारा

जैविक युद्धाबद्दलचं त्यांचं विधान चर्चेत

    08-Dec-2021
Total Views | 1230

bipin Ravat1 _1 &nbs




नवी दिल्ली : सीडीएस बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टरला गंभीर अपघात झाल्यानंतर देशभरातून त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली जात आहे. एका सक्षम आणि कतृत्ववान अधिकाऱ्याच्या अपघाताची बातमी संपूर्ण देशाला धडकी भरविणारी ठरली आहे.
यातच आता रावत यांनी केलेल्या विधानाची पुन्हा चर्चा होत आहे.


 PANEX-21 या कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी त्यांनी संपूर्ण देशाला इशारा दिला होता. रावत म्हणाले, "आता सर्व प्रकारच्या आपत्तींचा सामना करण्यासाठी सर्व देशांनी एकत्र येणे गरजेचे आहे." कोरोना महामारीचा उल्लेख करून त्यांनी जैविक युद्धाबद्दलही इशारा दिला होता.

 
ते म्हणाले, "आजपर्यंत विविध संकटे आली. त्यापैकी काही मानवनिर्मितीही होती. कोरोना विषाणूच्या नवा व्हेरिएंटनुसार आपल्यालाही तयार रहावे लागेल. जगात आता नव्या प्रकारचे युद्ध आकार घेऊ लागले आहे. आपली राष्ट्रे या प्रकारणांवरुन प्रभावित होणार नाहीत, याची खबरदारी घेतली पाहिजे. स्वतःला बळकट करायला हवे."






अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121