‘कोरोना’विरोधात आणखी दोन लसींच्या वापरास मंजुरी

    29-Dec-2021
Total Views | 93

vaccine _1

 


नवी दिल्ली : भारतीय कंपनी ‘बायोलॉजिकल ई’ तर्फे विकसित व निर्मित ‘कॉर्बिव्हॅक्स’ आणि अमेरिकन कंपनी ‘नोव्हाव्हॅक्स’तर्फे विकसित व ‘सीरम इन्स्टिट्यूट’तर्फे निर्मित ‘कोव्होव्हॅक्स’ या दोन नव्या कोरोनाविरोधी लसींना केंद्र सरकारने आपत्कालीन वापराची मंजुरी दिली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी मंगळवार, दि. २८ डिसेंबर रोजी दिली.
 
 
 
 
देशातील कोरोना लसीकरणाचा नवा टप्पा म्हणजेच वयवर्षे १५ ते १८ वर्षे वयोगटाचे लसीकरण सुरू होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर देशात दोन नव्या कोरोनाविरोधी लसींना मंजुरी देण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. मांडवीय यांनी दिली.
 
 
 
 
त्यानुसार, हैदराबादस्थित भारतीय कंपनी ‘बायोलॉजिकल ई’तर्फे विकसित व निर्मित ‘कॉर्बिव्हॅक्स’ आणि अमेरिकन कंपनी ‘नोव्हाव्हॅक्स’तर्फे विकसित व ‘सीरम इन्स्टिट्यूट’निर्मित ‘कोव्होव्हॅक्स’ या दोन लसी आणि ‘मोलनुपिरावीर’ या औषधाच्या वापरास मंजुरी देण्यात आली आहे. यापैकी ‘कॉर्बिव्हॅक्स आरबीडी प्रोटीन सबयुनिट’ प्रकारातील पहिली भारतीय लस आहे.
‘कोव्होव्हॅक्स’ ही ‘नॅनोपार्टिकल’ प्रकारातील लस आहे. त्याचप्रमाणे ‘मोलनुपिरावीर’ हे ‘अ‍ॅण्टिव्हायरल’ औषध असून प्रौढ कोरोनाग्रस्त तसेच रोग होण्याचा सर्वोच्च धोका असलेल्यांना आपत्कालीन परिस्थितीमध्ये त्याचा वापर केला जाणार आहे.
 
 
 
 
१५ ते १८ वयोगटातील लसीकरणाच्या नावनोंदणीस १ जानेवारीपासून प्रारंभ १५-१८ वर्षे वयोगटातील लोकसंख्येच्या श्रेणीमध्ये फक्त ’कोव्हॅक्सिन’ प्रशासित केले जाईल आणि ’कोव्हॅक्सिन’चे अतिरिक्त डोस सर्व राज्यांना पाठवले जातील आणि केंद्रशासित प्रदेश केंद्र सरकार येत्या काही दिवसांत सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना ‘कोव्हॅक्सिन’ च्या पुरवठ्याचे वेळापत्रक जारी करणार आहे.
 
 
 
 
संभाव्य लाभार्थी दि. १ जानेवारीपासून ‘को-विन’वर स्वतःची नोंदणी करू शकतात किंवा दि. ३ जानेवारीपासून लसीकरण सुरू झाल्यावर ‘वॉक-इन’ नोंदणीचा लाभ घेऊ शकतात. २००७ किंवा त्यापूर्वीचे जन्म वर्ष असलेले लोक या श्रेणीअंतर्गत लसीकरणासाठी पात्र असतील.
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121