मुंबई : रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या केशव सृष्टी, भाईंदर येथील प्रशिक्षण व संशोधन संस्थेसाठी विविध पदांसाठी भरती प्रक्रीया सुरू करण्यात आली आहे. यात प्रशासन प्रमुख, कार्यक्रम अधिकारी, मार्केटींग ऑफिसर, संशोधन प्रमुख आदी पदांसाठी अर्ज मागविण्यात येणार आहेत.
पुढील पदांसाठी भरती प्रक्रीया होणार सुरू -
• प्रशासन प्रमुख : पदवीधर, सामान्य प्रशासन व मनुष्यबळ, लेखा विभाग, मार्केटिंग आणि माहिती तंत्रज्ञान संबंधित बाबी स्वतंत्रपणे हाताळण्याची क्षमता, मार्केटिंग मॅनेजमेंटचे ज्ञान असल्यास प्राधान्य.
वय मर्यादा – ४५ वर्षे | रिक्त पदे - एक, ठिकाण - भाईंदर
• कार्यक्रम अधिकारी: पदवीधर, समाजातील विविध घटकांच्या प्रशिक्षण कार्यक्रमांच्या नियोजनाचा व कार्यवाहीचा, कार्यक्रम संचालनाचा अनुभव, शासकीय व निमशासकीय व इतर प्रकल्प प्रस्ताव लिहिणे, ग्रंथ निर्मिती, प्रकाशन व मुद्रण विषयक ज्ञान आवश्यक.
वय मर्यादा – ४० वर्षे | रिक्त पदे - एक, ठिकाण – भाईंदर
• विपणन अधिकारी (मार्केटिंग ऑफिसर): पदवीधर, अभ्यागत संपर्क, कार्यक्रम समन्वय व प्रभावी संभाषणकला तसेच व्यावसायिक (कॉर्पोरेट) क्षेत्रात मार्केटिंगचा अनुभव असणाऱ्या उमेदवारास प्राधान्य.
वय मर्यादा – ४० वर्षे | अनुभव : 3 वर्षे | रिक्त पदे - एक, ठिकाण - भाईंदर
• संशोधन प्रमुख : सामाजिक शास्त्रात पदव्युत्तर. सर्वेक्षण व संशोधन प्रकल्पांची आखणी व त्याची यशस्वी कार्यवाही करण्याची क्षमता असणे आवश्यक. डेटा मायनिंग, लघु-सर्वेक्षण, अहवाल लेखन, दस्तऐवजीकरण आणि प्रकाशन व मुद्रण विषयक ज्ञान आवश्यक.
वय मर्यादा – ४० वर्षे | अनुभव : २ वर्षे | रिक्त पदे - एक, ठिकाण – भाईंदर
वरील सर्व पदांसाठी अनुभवी व्यक्तीस प्राधान्य, स्वतंत्रपणे मराठी, हिंदी व इंग्रजीतून पत्रव्यवहार, कामाची आखणी व कार्यवाही तसेच जनसंपर्क व संगणकीय ज्ञान आवश्यक, शैक्षणिक पात्रता व अनुभवानुसार वेतन. उमेदवाराने आपले अर्ज दि.२५ डिसेंबर २०२१ पूर्वी job@rmponweb.org या ई- मेलवर पाठवावेत, अशी माहिती रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.